अहमदनगर : अहमदनगर दक्षिण येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात भीमशक्ती पक्षाचे पोपटराव जाधव, सूरज क्षेत्रे, चंद्रकांत नेटके, आमले यांसह अनेक कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पक्षाचे राज्य महासचिव किसन चव्हाण यांनी भूषवले, तर कार्यक्रमाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांनी केले. या प्रसंगी जिल्हा संघटक सुधीर ठोंबे, शेवगाव तालुकाध्यक्ष प्यारेलाल शेख यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पक्ष प्रवेशानंतर नव्याने दाखल झालेल्या कार्यकर्त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत वंचित बहुजन आघाडीच्या विचारधारेनुसार सामाजिक न्याय, समानता आणि परिवर्तनासाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करताना पक्ष संघटन विस्ताराचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. उपस्थितांनी नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत करत त्यांना संघटनेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.