नागपूर : आगामी कामठी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने पूर्ण ताकतीने निवडणूक लढण्याचा निर्धार केला असून, याचाच एक भाग म्हणून पक्षाच्या कामठी येथील नवीन पक्ष कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच भीमनगर, डॉ. शेंद्रे दवाखान्याजवळ रविवारी थाटात पार पडले.
यावेळी पूर्व विदर्भ संयोजक प्रशांत नगरकर, जिल्हाध्यक्ष अजय सहारे आणि जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
नगर परिषद निवडणुकीच्या तयारीसाठी हे कार्यालय महत्त्वपूर्ण ठरणार असून, या माध्यमातून पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करणे, संवाद बैठकांचे आयोजन करणे आणि मेळावे आयोजित करण्याबाबत यावेळी विस्तृत चर्चा करण्यात आली.
या कार्यक्रमाला प्रामुख्याने जिल्हा महासचिव सी.सी.वासे, राजेश ढोके, कार्यालयीन सचिव वैभव येवले, तालुकाध्यक्ष जगदीश रंगारी, शहराध्यक्ष दीपक वासनिक, रवी वानखेडे, विदेश डोंगरे, नयन जामगडे, सदानंद शेंडे, सुरेश सोमकुवर, शकील अहमद, मोहलता मेश्राम, अल्पेश वालदे आणि भाऊदास मेश्राम यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.