जालना : आगामी पंचायत समिती (PS) आणि जिल्हा परिषद (ZP) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीची (VBA) जिल्हास्तरीय बैठक जालना येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या बैठकीत पक्षाचे संघटन मजबूत करण्यावर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाचा प्रभाव वाढवण्यावर आणि उमेदवार निवड प्रक्रियेवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या महत्त्वपूर्ण बैठकीस वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रभारी नागोजीराव पांचाळ आणि जिल्हा अध्यक्ष डेविड दादा घुमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीत आगामी निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. यामध्ये पक्षाचा विस्तार करणे, मतदारांशी संपर्क वाढवणे आणि योग्य उमेदवारांची निवड करून निवडणुकीत अधिक जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवण्यावर भर देण्यात आला.
बैठकीदरम्यान जिल्हा प्रभारी नागोजीराव पांचाळ यांनी उपस्थितांना पक्षाच्या धोरणांबद्दल मार्गदर्शन केले आणि आगामी निवडणुकांसाठी सर्व कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. तसेच, जिल्हा अध्यक्ष डेविड घुमारे यांनी संघटनात्मक विस्तार आणि जनसंपर्क मोहिमेला गती देण्याचे निर्देश दिले.
या बैठकीला मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोकें, युवा जिल्हाध्यक्ष विजय भाऊ लहाने, कार्याध्यक्ष परमेश्वर खरात, जिल्हा महासचिव प्रशांत कजबे, महिला जिल्हाध्यक्षा सौ. रमाताई होरशिळ, ओबीसी नेते रामप्रसाद थोरात, जिल्हा उपाध्यक्ष सतीश खरात व अकबर इनमादार, जिल्हा संघटक राजेंद्र खरात, जिल्हा सचिव राजेंद्र वाजुळे, जिल्हा उपाध्यक्ष शेख लाला, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष प्रकाश पांखरे,
जालना तालुका अध्यक्ष भानदास साळवे, अंबड तालुका अध्यक्ष किशोर तुपे, युवा उपाध्यक्ष हरिष रत्नपारखे, शहर संघटक राहुल रत्नपारखे, तालुका उपाध्यक्ष विलास नरवाडे, तालुका संघटक कैलास जाधव, उपाध्यक्ष गोपाळ गावंडे, बदनापूर तालुका महासचिव दिपक खाजेकर, तालुका सचिव अंकुश गाडेकर, सरपंच अरुण भाऊ गिरी, अंबादास खरात सर यांच्यासह जिल्हा, तालुका, शहर पदाधिकारी, सर्कल निरीक्षक, गण व गट प्रमुख, शाखा प्रमुख आणि असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.