मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे आणि थेट आवाहन केले आहे. त्यांनी आपल्या अधिकृत एक्स हँडलवरून ट्विट करत ‘प्रस्थापित’ पक्षांना बाजूला सारून वंचित बहुजन आघाडीला संधी देण्याची मागणी केली आहे.
ॲड. आंबेडकर यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत प्रस्थापित पक्षांना बाजूला सारून वंचित बहुजन आघाडीला संधी द्या.
तसेच, सत्तेतील भागीदारीवर जोर देत त्यांनी पुढे म्हटले आहे की, आता सत्तेपासून दूर राहिलेल्या वंचित, शोषित, बहुजन समाजाने सत्तेत भागीदारी घेतलीच पाहिजे!