चेंबूर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृह, चेंबूर येथील विद्यार्थ्यांना भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या कथित दबावतंत्रामुळे खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याचा प्रयत्न केला जात होता.
मात्र, या गंभीर घटनेची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी तातडीने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क Police Drop False Charges on Students of Dr Babasaheb Ambedkar Hostel Chembur After Vanchit Bahujan Aghadi Intervention. त्यांच्या ठोस भूमिकेनंतर पोलीस प्रशासनाने आपली भूमिका बदलत विद्यार्थ्यांवरील खोटे गुन्हे तात्काळ थांबवले, ज्यामुळे विद्यार्थ्यांवरील अन्याय दूर झाला.
यावेळी रात्री उशिरा (पहाटे ३ वाजता) वंचित बहुजन आघाडी मुंबईच्या अध्यक्ष स्नेहल सोहनी, कुर्ला तालुक्याचे स्वप्नील जवळगेकर, वार्ड १५५ चे स्वप्नील वाघमारे, कालिना तालुक्याचे योगेश निकम यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि वस्तीगृहातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.