संजीव चांदोरकर
गेल्या काही वर्षात शेअर्स मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या काही पटींनी वाढली आहे. विशेषतः त्यांच्यासाठी
ट्रम्प यांच्या तिकडम बाजीमुळे जगातील शेयर मार्केट्स कोसळतील असे अंदाज व्यक्त होत होते. पण तसे झालेले दिसत नाही.
ट्रम्प यांच्यामुळे नव्हे तर ऐतिहासिक उच्चांकावर पोचलेली स्टॉक मार्केट्स अंतर्गत संरचनात्मक ( internal structural contradictions) ताण-तणावामुळे कोसळू शकतात
डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर, त्यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांमुळे आधीचे अनेक संदर्भ वेगाने बदलत आहेत.
उलटपक्षी जागतिक अर्थव्यवस्थेतील वाढत्या जोखीमांना न जुमानता प्रमुख देशांतील स्टॉक मार्केट्स नवनवीन उच्चांक प्रस्थपित करत आहेत. अमेरिकेतील नॅसडॅक, डाऊ-जोन्स, जपानमधील निक्की-२२५, ब्रिटनमधील “एफटीएसइ” ऐतिहासिक उच्चांकावर आहेत. तर भारताचा सेन्सेक्स ऐतिहासिक उच्चांकापेक्षा फक्त चार टक्क्यांनी खाली आहे.
त्यामुळे सगळीकडे आलबेल आहे असे चित्र तयार झाले आहे ; पण …..
…. पण वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे ; जागतिक वित्त क्षेत्रात / स्टॉक मार्केटमध्ये गेल्या दोन दशकात झालेल्या मूलभूत बदलांमुळे अनेक ताणतणाव तयार झाले आहेत ; त्यातील काही प्रमुख ताणतणाव
१. केंद्रीय बँका, भांडवल बाजार नियामक मंडळांच्या नियमनाच्या चिमटीत न येणाऱ्या, बँकिंग सदृश्य व्यवहार करणाऱ्या (शॅडो बँकिंग) विविध प्रकारच्या वित्तसंस्था प्रत्येक देशात वेगाने वाढत आहेत. यात प्रचंड भांडवल वाहत येत आहे. शिथिल नियमनाच्या बाहेर वाढणाऱ्या “शॅडो बँकिंग” मधून एक नवीन प्रकारची जोखीम जन्माला येत आहे. जी पूर्वी नव्हती.
Akola : मुर्तीजापूर तालुक्यातील दुहेरी हत्याकांडप्रकरणी वानखडे कुटुंबीयांनी सुजात आंबेडकर यांची घेतली भेट!
२. कर्ज काढून शेअर्समध्ये गुंतवणुकी करणाऱ्या गुंतवणूकदारांचे प्रमाण वाढते आहे. शेयर्सच्या किमती खाली येऊ लागल्यावर होऊ शकणाऱ्या तोट्याचे प्रमाण कमी ठेवण्यासाठी एकाच वेळी अनेक कर्जदार-गुंतवणूकदार शेअर्सची विक्री करू लागू शकतात. त्यामुळे शेअर बाजार निर्देशांक देखील वेगाने घसरतात.
३. गेल्या काही वर्षात स्टॉक मार्केटमध्ये शेअर्सची खरेदी विक्री करणाऱ्या, कोणताच मानवी हस्तक्षेप नसणाऱ्या, आज्ञाप्रणाली (अल्गोरीदम) विकसित झाल्या आहेत. त्याचा आणि “आर्टिफिशियल इंटेलिजन्स”चा वापर करत निमिषार्धात शेअर्सची खरेदी विक्री करणाऱ्या “हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग” कंपन्या तयार झाल्या आहेत. अमेरिकेत तर दिवसभरातील एकूण व्यवहारांपैकी ७० टक्के व्यवहार अशा पद्धतीने होत आहेत.
४ स्टॉक मार्केट जगातील अनेक देशात कार्यरत असली तरी त्यातील व्यवहारांचे फक्त मूठभर देशात केंद्रीकरण झाले आहे. जगातील सर्व स्टॉक मार्केटसचे एकत्रित बाजारमूल्य १२७ ट्रिलियन डॉलर आहे. त्यापैकी फक्त पाच देशांचा (अमेरिका, चीन, युरोपियन युनियन, जपान आणि भारत) वाटा दोन तृतीयांश भरतो. या दोन तृतीयांशापैकी एकट्या अमेरिकेचा वाटा ५० टक्के आहे, जो फक्त पंधरा वर्षांपूर्वी ३० टक्के होता. एवढेच नाही तर अमेरिकेतील फक्त दहा महाकाय कंपन्यांचे बाजारमूल्य अमेरिकेच्या एकूण बाजारमूल्याच्या ५० टक्के आहे. याला वित्तीय परिभाषेत “कॉन्सन्ट्रेशन रिस्क” म्हणतात.