पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि पदवीधर-शिक्षक विधानसभा निवडणुकांच्या तयारीच्या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची (VBA) पुणे शहर, पुणे जिल्हा आणि पिंपरी-चिंचवड शहर येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी एका महत्त्वपूर्ण संवाद बैठकीचे आयोजन केले आहे.
मंगळवार, दिनांक १४ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता कोरेगावपार्क, पुणे येथील मौलाना अब्दुल कलाम आझाद सभागृहात ही बैठक होणार आहे.
या बैठकीला प्रा. अंजलीताई आंबेडकर आणि सुजात आंबेडकर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत आगामी निवडणुकांसाठी पक्षाच्या तयारीचा आणि रणनीतीचा सखोल आढावा घेतला जाणार आहे. याशिवाय, पश्चिम आणि पूर्व पुणे परिसरातील संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.
या ‘संवाद’ बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय महासचिव ऍड. प्रियदर्शी तेलंग, राष्ट्रीय सदस्य नितीन ढेपे, प्रदेश उपाध्यक्ष अनिल अण्णा जाधव, ऍड. सर्वजीत बनसोडे, सोमनाथ साळुंके आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनचे प्रवक्ते प्रशांत बोराडे यांचा समावेश आहे.