Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home अर्थ विषयक

देशात टोकाची आर्थिक विषमता तयार झाली की हुकूमशहा का जन्माला येत असतील ? परस्परांचा काय संबंध ? : अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प यांची केस स्टडी.

mosami kewat by mosami kewat
October 6, 2025
in अर्थ विषयक
0
देशात टोकाची आर्थिक विषमता तयार झाली की हुकूमशहा का जन्माला येत असतील ? परस्परांचा काय संबंध ? : अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प यांची केस स्टडी.

देशात टोकाची आर्थिक विषमता तयार झाली की हुकूमशहा का जन्माला येत असतील ? परस्परांचा काय संबंध ? : अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प यांची केस स्टडी.

       

संजीव चांदोरकर

अमेरिकेतील शेअर मार्केटचे बाजार मूल्य ५५ ट्रिलियन डॉलर्स आहे. त्यातील फक्त पहिल्या १० कंपन्यांचे बाजार मूल्य एकूण बाजार मूल्याच्या ४० टक्के आहे. म्हणजे जवळपास २२ ट्रिलियन डॉलर्स. (भारतातील सर्व कंपन्यांचे मिळून बाजार मूल्य ५ ट्रिलियन डॉलर्सच्या आत मध्ये आहे).

अमेरिकेतील एकूण शेअर्स पैकी ८७ टक्के शेअर्स देशातील फक्त १० टक्के नागरिक गुंतवणूकदारांकडे आहेत. गेल्या पाच वर्षात, ज्या प्रमाणात शेअर्सचे भाव वाढले त्याप्रमाणात या दहा टक्के नागरिकांची संपत्ती देखील वाढली आहे.

अमेरिकेतील फक्त तीन (फक्त तीन! ) अब्जाधीशांकडे जेवढी संपत्ती गोळा झाली आहे ती अमेरिकेतील तळातील अर्ध्या नागरिकांच्या एकूण संपत्तीपेक्षा देखील जास्त आहे.

अमेरिकेतील सर्व नागरिकांचे मिळून जेवढे वार्षिक उत्पन्न असते त्यातील ४५ टक्के वाटा फक्त वरच्या एक टक्का व्यक्तींकडे जातो.

अमेरिकेतील मोठ्या कॉर्पोरेट मधील मुख्याधिकाऱ्याला मिळणारे वार्षिक पॅकेज त्याच कंपनीत काम करणाऱ्या कामगाराला मिळणाऱ्या सरासरी मिळकती पेक्षा ३५० पट जास्त असते.

अमेरिकेत संपत्ती (wealth) आणि कुटुंबांची मिळकत (income) या दोन्हींमध्ये असणारी सद्यकालीन आर्थिक विषमता न गेल्या शंभर वर्षात बघितलेली नव्हती. (आधी एवढी सविस्तर आकडेवारी उपलब्ध देखील नव्हती).

अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात “ऑलिगार्क”, म्हणजे मूठभर श्रीमंत नागरिकांची सत्ता स्थापन झाली आहे असे म्हटले जाते ; वर वर्णन केलेलेच ऑलिगार्क आहेत.

फक्त मूठभर अमेरिकन नागरिकांच्या हातात सातत्याने गोळा होणारी महाकाय संपत्ती, आणि त्याच्या जोरावर सारा देश मूठभर “ओलिगार्क”च्या हातात जाणे हा आजच्या अमेरिकेत हा सर्वात मोठा आर्थिक ज्वलंत प्रश्न बनला आहे.

टोकाच्या आर्थिक विषमतेतून मुठभर लोकांची हुकूमशाही का तयार होत असावी ? कारण त्यांना माहित असतं की टोकाच्या आर्थिक विषमतेतून टोकाचा असंतोष तयार होत असतो. त्याला दडपण्यासाठी त्यांना हुकूमशहाची गरज लागते.

देशात टोकाची आर्थिक विषमता नसणे ही त्या देशात खरीखुरी लोकशाही नांदण्याची पूर्वअट आहे. नेहमीच. म्हणून लोकशाहीच्या प्रश्नावर काम करणाऱ्यांनी आर्थिक विषमता कमी करणाऱ्या कार्यक्रमाशी देखील जोडून घेतले पाहिजे. या दोन भिन्न गोष्टी नाहीच आहेत.

अमेरिकेत नक्की काय सुरु आहे याची माहिती का घ्यायची ? तर आपल्या भारतात काय सुरु आहे आणि भविष्यात काय होऊ शकते याची राजकीय अंतर्दृष्टी यायला मदत होते म्हणून.

भारत अमेरिकेच्या वाटेवर चालत आहे हे नक्की. याचे महत्त्वाचे कारण भारतातील धोरणकर्ते, ऑपिनियन मेकर्स, मध्यमवर्ग यांनी अमेरिकन अर्थव्यवस्था, अमेरिकन समाज यांचेच मॉडेल प्रमाणभूत मानले आहे. गेली अनेक दशके. एवढे की त्यांना बारकाव्यात जाऊन अमेरिकेबद्दल माहिती घेण्याची गरज देखील वाटत नाही. ( म्हणजे तुम्हाला चीनचे मॉडेल प्रमाणभूत असावे असे म्हणायचे आहे अशी नेहमीची व्हॉट अबाउटरी करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा).

भारतात देखील टोकाची आर्थिक विषमता आणि मूठभरांची सत्ता हातात हात घालून वेगाने पुढे येत आहेत. अमेरिका बरीच पुढे गेली आहे, तुलनेने भारत मागे आहे एवढाच काय तो फरक.


       
Tags: case studyDonald TrumpEconomicEconomicInequalityGlobalTrendsIncomeDisparitySocioEconomicIssues
Previous Post

नाशिकमध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त वंचित बहुजन युवा आघाडीतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

Next Post

Crime : रायबरेलीत चोरीच्या संशयावरून दलित तरुणाची जमावाकडून हत्या; ॲड. आंबेडकरांची तीव्र प्रतिक्रिया

Next Post
Crime : रायबरेलीत चोरीच्या संशयावरून दलित तरुणाची जमावाकडून हत्या; ॲड. आंबेडकरांची तीव्र प्रतिक्रिया

Crime : रायबरेलीत चोरीच्या संशयावरून दलित तरुणाची जमावाकडून हत्या; ॲड. आंबेडकरांची तीव्र प्रतिक्रिया

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
काँग्रेसची माघार, ‘वंचित’ला बळ! प्रभाग ११ मध्ये इब्राहिम पटेल यांचा आयुब खान यांना पाठिंबा
बातमी

काँग्रेसची माघार, ‘वंचित’ला बळ! प्रभाग ११ मध्ये इब्राहिम पटेल यांचा आयुब खान यांना पाठिंबा

by mosami kewat
January 2, 2026
0

औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या प्रक्रियेत प्रभाग क्रमांक ११ मध्ये राजकीय भूकंप झाला आहे. काँग्रेसचे  नेते आणि माजी नगरसेवक इब्राहिम...

Read moreDetails
औरंगाबाद महापालिका निवडणूक: प्रभाग ९ मध्ये शिवसेनेची (UBT) माघार; वंचितचे सतीश पटेकर यांना जाहीर पाठिंबा

औरंगाबाद महापालिका निवडणूक: प्रभाग ९ मध्ये शिवसेनेची (UBT) माघार; वंचितचे सतीश पटेकर यांना पाठिंबा

January 2, 2026
ठाण्यात निवडणुकीच्या तोंडावर राडा! वंचितचे उमेदवार संतोष खरात यांच्या कार्यकर्त्यांच्या वाहनांची तोडफोड

ठाण्यात निवडणुकीच्या तोंडावर राडा! वंचितचे उमेदवार संतोष खरात यांच्या कार्यकर्त्यांच्या वाहनांची तोडफोड

January 2, 2026
वसई-विरार महानगरपालिका निवडणूक: उमेदवारांची पहिली ११ प्रभागनिहाय यादी जाहीर

वसई-विरार महानगरपालिका निवडणूक: उमेदवारांची पहिली ११ प्रभागनिहाय यादी जाहीर

January 1, 2026
नवी मुंबई महापालिका निवडणूक : वंचित बहुजन आघाडीची 18 उमेदवारांची यादी जाहीर

नवी मुंबई महापालिका निवडणूक : वंचित बहुजन आघाडीची 18 उमेदवारांची यादी जाहीर

January 1, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home