अक्कलकोट : सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील मौजे कर्जाळ येथे वंचित बहुजन आघाडीची शाखा उद्घाटन जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी बोलताना जिल्हा अध्यक्ष मडीखांबे म्हणाले की, “तळागाळातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी, वंचित समाजाला सत्तेत योग्य वाटा मिळवून देण्यासाठी तसेच संविधानात दिलेले हक्क, स्वातंत्र्य व समता प्रस्तापित करून स्वाभिमानाने जगण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर सातत्याने लढा देत आहेत. या लढ्यात आपण सर्वांनी एकजुटीने खंबीरपणे साहेबांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे.” असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाला युवा तालुका अध्यक्ष शिलामणी बनसोडे, तालुका महासचिव नागेश हरवाळकर, सम्यक विद्यार्थी आंदोलन राज्य प्रवक्ते रवीराज पोटे, शहर अध्यक्ष विशाल ठोंबरे, गंगाराम गायकवाड यांनी उपस्थित राहून मनोगत व्यक्त केले.
यावेळी तालुका संघटक बबन गायकवाड, युवा तालुका संघटक योगेश सोनकांबळे, शाखा अध्यक्ष शंकर माने, राजकुमार वाघमारे यांच्यासह कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक यशवंत इंगळे, तसेच कर्जाळ गावातील माता-भगिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.