सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत भेटींचे आयोजन
पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर पश्चिम महाराष्ट्राचा दोन दिवसांचा झंझावाती दौरा करणार आहेत. शनिवार, २७ सप्टेंबर आणि रविवार, २८ सप्टेंबर २०२५ या दोन दिवसांत ते चार महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत, तसेच या दौऱ्याचा समारोप सांगोला येथे होणाऱ्या जाहीर सभेने होणार आहे.
दौऱ्याचे सविस्तर वेळापत्रक :
२७ सप्टेंबरचा दौरा :
सकाळी ११.०० वाजता : साताऱ्यातील सौभाग्य मंगल कार्यालय, फॉरेस्ट ऑफिस समोर, बोडोली नाका येथे त्यांची पहिली भेट होईल.
दुपारी २.०० वाजता : यानंतर ते कोल्हापूरकडे प्रयाण करतील आणि यशवंत मंगल कार्यालय, मुडशिंगी, NH4 हायवे जवळ येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधतील.
२८ सप्टेंबरचा दौरा :
सकाळी १०.०० वाजता : दुसऱ्या दिवशी सांगली येथील रोटरी क्लब हॉल, सिव्हील हॉस्पिटल जवळ येथे त्यांची भेट नियोजित आहे.
दुपारी २.०० वाजता : यानंतर सोलापूर जिल्ह्यातील राजपूत लॉन्स, पंढरपूर रोड, मंगळवेढा येथे त्यांची बैठक होणार आहे.
सायंकाळी ५.०० वाजता : या दौऱ्याचा समारोप सांगोल्यात होणाऱ्या जाहीर सभेने होणार असून, ही सभा सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आली आहे.
सुजात आंबेडकर हे आपल्या दौऱ्यात निवडणुकीची रणनीती, सामाजिक न्याय, स्थानिक विकास आणि युवा नेतृत्व या महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर आपले विचार मांडण्याची शक्यता आहे. या दौऱ्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे.