पुणे : वंचित बहुजन आघाडी पुणे शहराच्या वतीने पुणे करार अधिकार दिनानिमित्त पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी कार्यकर्त्यांनी 24 सप्टेंबर 1932 रोजी येरवडा कारागृहात महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात झालेल्या पुणेकराराचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित केले. या करारामुळे भारतातील अस्पृश्य समाजाला शिक्षण, नोकरी व राजकीय क्षेत्रात आरक्षणाच्या माध्यमातून हक्क मिळाले. त्यामुळे हा दिवस अधिकार दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो.
या कार्यक्रमाला शहराध्यक्ष अॅड. अरविंद तायडे, महिला आघाडी अध्यक्षा अनिता चव्हाण, महासचिव अॅड. रेखा चौरे, शहर सचिव प्रा. बी. पी. सावळे, प्रभाकर सरोदे, अरविंद कांबळे, उमेश साळवी, श्रीनिवास दासारी, प्रवीण बागुल, प्रतिमा कांबळे, विजया ओव्हाळ, निरंजना सोनवणे, वर्षा जाधव, भारती वांजळे, अपर्णा सोनवणे व छाया बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते.