नागपूर : वंचित बहुजन आघाडी तालुका सावनेर व शहर कार्यकारिणीची प्रथम बैठक सावनेर येथील विश्रामगृहात पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान जिल्हाध्यक्ष अजय सहारे यांनी भूषविले. जिल्हा उपाध्यक्ष विजय बागडे, जिल्हा पदाधिकारी शांताराम ढोके, धनेश्वर ढोके, तालुकाध्यक्ष सचिन मडके, शहराध्यक्ष सुशील ब्रह्मरक्षे, कार्यालयीन सचिव वैभव येवले व आय.टी. सेल प्रमुख शुभम वाहने यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली.
बैठकीदरम्यान नवनियुक्त तालुका कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सावनेर तालुका व शहरातील अनेक युवकांनी मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करून पक्षाची ताकद वाढवली. शुभम लोखंडे, यश गवळी, तेजस नारनवरे, महेश मडावी, मधू वाकोडे, कन्हैया पाटील, मनोहर कापसे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.
आगामी काळात तालुक्यातील 7 जिल्हा परिषद सर्कल व शहरातील 11 प्रभागांमध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये संघटनात्मक बांधणी कशी करावी, याबाबत मार्गदर्शन व कार्यक्रम आखण्यात आला.
या बैठकीला जिल्हा व तालुका पदाधिकारी कविता सूर्यवंशी, नंदा बागडे, रेखा बोरकर, परमानंद मानवटकर, मनोज बागडे, एकनाथ मेश्राम, विकास मेश्राम, संकल्प वासनिक, भाऊराव लांजेवार, राजू बागडे, विशाल वासनिक, उमेश मोरे, सुरज गणेर आदी उपस्थित होते.