औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीची एक महत्त्वपूर्ण बैठक आज शहराच्या जिल्हा पक्ष कार्यालयात पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पक्षाच्या राष्ट्रीय सदस्य आणि महाराष्ट्र राज्य महिला महासचिव अरुंधतीताई शिरसाठ होत्या.
या बैठकीत नुकत्याच घोषित झालेल्या युवा आणि शहर कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. अरुंधतीताई शिरसाठ यांनी आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच, नवनियुक्त पदाधिकाऱ्यांकडून निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला.
यावेळी, युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, मध्य शहराध्यक्ष मिलिंद बोर्डे, पश्चिम शहराध्यक्ष ॲड. पंकज बनसोडे, पूर्व शहराध्यक्ष मतीन पटेल, युवा मध्य शहराध्यक्ष संदीप जाधव, युवा पश्चिम शहराध्यक्ष राहुल मकासरे यांसह प्रभाकर बकले,
योगेश बन, पी.के. दाभाडे, भाऊराव गवई, रुपचंद गाडेकर, गोकुळ भुजबळ, मेघानंद जाधव, एस.पी. मगरे, कोमल हिवाळे, वंदनाताई जाधव, साधना पठारे, संगीता डोंगरे, छाया मेश्राम, सुलोचनाताई साबळे, प्रवीण जाधव, बाबासाहेब वाघ, प्रशांत बोर्डे, आशुतोष नरवडे, नागेश जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.
वसई-विरारमध्ये सुजात आंबेडकरांची गर्जना; वसई-विरारच्या विकासासाठी वंचितला संधी द्या; सुजात आंबेडकरांचे मतदारांना आवाहन
वसई: वसई-विरार महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचाराने महाराष्ट्र धुमाकूळ माजवला आहे. या महापालिका निवडणुकीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात...
Read moreDetails






