अकोला : वंचित बहुजन आघाडीने धम्मचक्र परिवर्तन दिनाचे औचित्य साधून बार्शीटाकळी शहरातील आणि तालुक्यातील गरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत इंग्रजी क्लासेस सुरू केले आहेत. बार्शीटाकळी शहर प्रसिद्धी प्रमुख अमित तायडे यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या उपक्रमाचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमाला अकोला महानगरपालिकेचे माजी गटनेते गजानन गवई यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते शेख नईमोद्दीन, नगरपरिषदेचे माजी गटनेते सुनील शिरसाठ, शहराध्यक्ष अजहर पठाण, माजी नगरसेवक श्रावण भातखडे, माजी रुग्ण कल्याण समिती सदस्य इमरान खान, अनिल धुरंधर, माजी युवा तालुका अध्यक्ष अमोल जामनिक, श्री. खंडारे, दादाराव जामनिक, सय्यद अन्सार, शहर महासचिव शुभम इंगळे, आदी मान्यवर उपस्थित होते.
‘किन्नर माँ’ संस्थेचा ११ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे यांनी विद्यार्थी आणि उपस्थित पालकांना प्रोत्साहन दिले. जाधव सर या मोफत कोचिंग क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांना शिकवणार आहेत. या उपक्रमासाठी बार्शीटाकळी तालुक्यातील ११० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादाराव जामनिक आणि सुनील शिरसाठ यांनी केले, तर आभार प्रदर्शन माजी नगरसेवक श्रावण भातखडे यांनी केले.
वंचित बहुजन आघाडीने सुरू केलेल्या या उपक्रमामुळे हा पक्ष केवळ एक राजकीय पक्ष नसून, गोरगरीब लोकांसाठी काम करणारी एक चळवळ आहे, अशी भावना उपस्थित पालकांनी व्यक्त केली. वंचित बहुजन आघाडीच्या या उपक्रमाची चर्चा सध्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये होत आहे.
आर्थिक आधारावर आरक्षण ही सुप्रिया सुळेंची मागणी काँग्रेस- आरजेडीला मान्य आहे का? – वंचित बहुजन आघाडीचा सवाल!
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आरक्षणाला आव्हान दिल्याचे आरोप सध्या राजकीय वर्तुळात...
Read moreDetails