नाशिक : लासलगाव टाकळी येथे मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली. जातीयवादी मानसिकतेतून उच्च वर्गीय मुलीसोबत प्रेम प्रकरण असल्या कारणाने वाल्मिकी समाज्याच्या कुंदन चावरिया या तरुणाची हत्या करण्यात आली.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष चेतन गांगुर्डे आणि पदाधिकारी यांनी पीडित कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली. आणि नातेवाईकांना घेऊन स्थानिक पोलीस स्टेशन गाठले.
पोलिसांनी तपास लोहमार्ग पोलीस स्टेशन मनमाड यांच्या कडे वर्ग केला आहे. या प्रकरणात सुरवातीला 307 हे कलम होते परंतु मृत्यू नंतर 103 व 325 कलम एफआयआरमध्ये दाखल होतील, असे पोलिसांनी माहिती देतांना सांगितले.
पीडित कुटुंबियांच्या सोबत वंचित बहुजन आघाडी कायम सोबत राहील व पोलिसांनी कसूर केल्यास रस्त्यावर उतरू असे प्रतिपादन माध्यमाशी बोलतांना जिल्हा अध्यक्ष चेतन गांगुर्डे यांनी केले.
सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा कुलगुरूंना तीन दिवसांचा अल्टिमेटम; ठराव मागे घेऊन जाहीर माफी मागण्याची मागणी
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चांवर निर्बंध घालणारा ठराव मागे घेऊन सम्यक विद्यार्थी आंदोलनाची...
Read moreDetails






