अहमदनगर : शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यात अतिवृष्टी व ढगफुटी झाल्याने दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून उभी पिके वाहून गेली आहे. तसेच पशुधनही वाहून गेले आहेत, अनेक घरांची पडझड झाल्याने शेतकरी बांधवांवर अस्मानी संकट उभे ठाकले आहेत. आजमितीला शेतकरी बांधवांची अवस्था दयनीय झाली असून यातून सर्व शेतकरी बांधवांना आधार देण्यासाठी सरकारने तातडीने सरसकट नुकसान भरपाई द्यावी, आमदार, खासदार आणि पालकमंत्री यांनी दोन्ही तालुक्यातील अतिवृष्टीने बाधित झालेल्या गावांना भेटी दिल्या पाहणी केली. आता याच प्रतिनिधिनीनी फक्त पाहणी करण्याची नौटंकी नं करता तातडीने शेतकऱ्यांना आर्थिक मदत कशी मिळेल यासाठी प्रयत्न करावे.
त्याचप्रमाणे मागील काही वर्षापूर्वी असेच अतिवृष्टी चे अस्मानी संकट शेतकरी बांधवावर आले होते. तेव्हा शासनाने, वर्ग दोन, व उताऱ्यावर पोटखराबा नोंदी असलेल्या शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई दिली नाही.
तरी यावेळी सरसकट सर्व शेतकऱ्यांना कुणावर ही अन्याय न करता नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्ठमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी गिते यांना भेटून केली आहे
यावेळी अहमदनगर जिल्हा अध्यक्ष योगेश साठे शेवगाव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलाल, अमोल मिरपगार, योगेश गुंजाळ नागेश शिंदे आदी उपस्थित होते.