Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Crime : धुळे जिल्ह्यामध्ये १६ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अटकेत

mosami kewat by mosami kewat
September 19, 2025
in बातमी
0
चाळीसगावात ६५ कोटींचे ड्रग्ज पकडले, मुख्य सूत्रधाराला तामिळनाडूतून अटक

चाळीसगावात ६५ कोटींचे ड्रग्ज पकडले, मुख्य सूत्रधाराला तामिळनाडूतून अटक

धुळे : शिरपूर तालुक्यातील रुपसिंगपाडा गावामध्ये पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे १६ लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्यावर शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांना एका गुप्त बातमीदाराकडून अमली पदार्थांच्या तस्करीची माहिती मिळाली होती. रुपसिंग दुर्गा पावरा नावाचा व्यक्ती त्याच्या घराच्या मागील शेतात मोठ्या प्रमाणात गांजा लपवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पोलीस निरीक्षक हिरे यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन पथकासह रुपसिंगपाडा येथे छापा टाकला. आरोपीच्या घराच्या मागील शेतात उसाच्या पिकामध्ये लपवलेल्या अवस्थेत पोलिसांना एक पत्र्याची कोठी आणि चार निळ्या रंगाचे प्लास्टिकचे ड्रम सापडले.

त्यांची तपासणी केली असता, त्यात एकूण २२९.४२० किलोग्रॅम गांजा आढळून आला, ज्याची अंदाजित किंमत १६ लाख ५ हजार ९४० रुपये आहे. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त केला असून आरोपी रुपसिंग दुर्गा पावरा याला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे अमली पदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Tags: arrestedDhule crimeFIRMaharashtrapoliceVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

Mahabodhi Mahavihar protest : जिल्हाधिकारी कार्यालयावर महाबोधी विहार मुक्तीसाठी जन आक्रोश आंदोलन

Next Post

जीत सोनेकरच्या मारेकऱ्यांना फाशी द्या – वंचित बहुजन आघाडीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Next Post
जीत सोनेकरच्या मारेकऱ्यांना फाशी द्या – वंचित बहुजन आघाडीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

जीत सोनेकरच्या मारेकऱ्यांना फाशी द्या – वंचित बहुजन आघाडीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
अकोल्यात वाढत्या महागाईविरोधात वंचित बहुजन आघाडीचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य बैलगाडी मोर्चा
बातमी

अकोल्यात वाढत्या महागाईविरोधात वंचित बहुजन आघाडीचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य बैलगाडी मोर्चा

by mosami kewat
May 25, 2026
0

अकोला : देशभरात सातत्याने वाढत असलेल्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन अधिक कठीण बनले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या गगनाला भिडलेल्या दरांमुळे...

Read moreDetails
वाढत्या महागाईविरोधात अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली ‘भव्य बैलगाडी रॅली’

वाढत्या महागाईविरोधात अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली ‘भव्य बैलगाडी रॅली’

May 25, 2026
Maharashtra Fuel Crisis : पेट्रोल-डिझेल टंचाईचे रुद्ररूप; डिझेलसाठी चक्क हाणामारी, शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा

Maharashtra Fuel Crisis : पेट्रोल-डिझेल टंचाईचे रुद्ररूप; डिझेलसाठी चक्क हाणामारी, शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा

May 24, 2026
भारतीय अर्थव्यवस्था (२): मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर , कमकुवत कडी !

भारतीय अर्थव्यवस्था (२) : मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, कमकुवत कडी !

May 24, 2026
मोदी अमेरिकेच्या तालावर नाचत आहेत – ॲड. प्रकाश आंबेडकर

मोदी अमेरिकेच्या तालावर नाचत आहेत – ॲड. प्रकाश आंबेडकर

May 24, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home