अकोला : ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी सकल ओबीसी समाजाच्या वतीने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आमरण उपोषणाला आज वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी भेट दिली.
यावेळी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “ओबीसींच्या आरक्षणात वाटेकरी नको” ही वंचित बहुजन आघाडीची ठाम भूमिका सुरुवातीपासूनच आहे. ओबीसी आरक्षणाचे ताट वेगळे आणि मराठा आरक्षणाचे ताट वेगळे असले पाहिजे.
उपोषणस्थळी उपस्थित ओबीसी समाजाच्या नेत्यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठिंब्याचे स्वागत केले आणि हा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला.