सोलापूर : नागणसूर येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उदघाटन जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर अण्णा मडिखांबे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी विविध मान्यवर आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमास युवक तालुकाध्यक्ष शिलामणी दादा बनसोडे, शहराध्यक्ष विशाल ठोंबरे, जिल्हा युवक उपाध्यक्ष प्रकाश शिंदे, सम्यक विद्यार्थी आंदोलन राज्य प्रवक्ता रवि पोटे तसेच शाखेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.
या उदघाटनानिमित्त स्थानिक पातळीवर पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्याचा निर्धार करण्यात आला. वंचित, शोषित आणि बहुजनांच्या प्रश्नांवर भक्कमपणे लढा देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.