नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळुंज गाव येथे वंचित बहुजन महिला आघाडीची तालुका कार्यकारिणी निवड प्रक्रिया मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यक्रमादरम्यान विविध जातीधर्मातील महिलांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर पक्षप्रवेश करून सामाजिक ऐक्य आणि सशक्त महिलांच्या राजकारणात सहभागाचा संदेश दिला.
या वेळी वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा उर्मिला गायकवाड, पंडित नेटावदे, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव, जिल्हा महासचिव प्रतिभा पानपाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
मान्यवरांनी महिलांना संघटनात सक्रियपणे काम करण्याचे आवाहन करत आगामी निवडणुकांत महिलांची भक्कम भूमिका असणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे आयोजन विमल काशीद व अरुणभाऊ काशीद यांनी केले. कार्यक्रमाला स्थानिक कार्यकर्त्यांसह अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.