Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

नागपूर ग्रामीण तालुका नवनियुक्त कार्यकारिणीची बैठक उत्साहात पार; स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांवर रणनीती

mosami kewat by mosami kewat
September 15, 2025
in बातमी
0
नागपूर ग्रामीण तालुका नवनियुक्त कार्यकारिणीची बैठक उत्साहात पार; स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांवर रणनीती
       
नागपूर : वंचित बहुजन आघाडीच्या नागपूर ग्रामीण तालुक्यातील नवनियुक्त कार्यकारिणीची बैठक जिल्हा अध्यक्ष अजय सहारे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या बैठकीत जिल्हा सचिव सोनियाताई वानखेडे, वैभव येवले, शुभम वाहने यांची प्रमुख उपस्थिती होती.

बैठकीत प्रामुख्याने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुकांचा आढावा घेण्यात आला. वंचित बहुजन आघाडीने या निवडणुका ताकदीने लढविण्याचा निर्धार व्यक्त केला. यासाठी संपूर्ण जिल्हा परिषद सर्कलमध्ये संघटनात्मक बांधणी करून कार्यकर्त्यांना जबाबदाऱ्या वाटप करण्याचे ठरविण्यात आले.

जिल्हाध्यक्ष अजय सहारे यांनी नवनियुक्त तालुका कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांना संघटन कार्य, जबाबदाऱ्या आणि निवडणूक तयारी याबाबत मार्गदर्शन केले. कार्यकर्त्यांनी गावपातळीवर जनतेशी संपर्क साधून आघाडीची विचारधारा पोहोचवावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या बैठकीस तालुकाध्यक्ष अमन जामगडे, कार्याध्यक्ष नागेश बोरकर, महासचिव राजेश्वर पिल्लेवान, चंद्रशेखर पाटील, अरविंद सवईतुल, विनायक घुमटकर, दर्शन बेले, राजेश वानखेडे, बंटी पानतावणे व बळीराम चक्रे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

बैठकीत झालेल्या चर्चेनंतर आगामी काळात वंचित बहुजन आघाडी नागपूर ग्रामीण तालुक्यात अधिक संघटित पद्धतीने कार्यरत राहील आणि जनतेच्या प्रश्नांवर ठामपणे भूमिका घेईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Tags: ElectionMaharashtranagpurVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

वंचित बहुजन आघाडीचे अक्कलकोटमध्ये युवा एल्गार सभा; सुजात आंबेडकर यांचे मार्गदर्शन

Next Post

Washim : वंचित बहुजन युवा आघाडीच्या शाखा उद्घाटन सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post
Washim : वंचित बहुजन युवा आघाडीच्या शाखा उद्घाटन सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

Washim : वंचित बहुजन युवा आघाडीच्या शाखा उद्घाटन सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
शासकीय विश्रामगृह, नांदेड येथे सुजात आंबेडकर यांची संवाद बैठक
बातमी

शासकीय विश्रामगृह, नांदेड येथे सुजात आंबेडकर यांची संवाद बैठक

by mosami kewat
August 11, 2026
0

नांदेड: शासकीय विश्रामगृह, नांदेड येथे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत एक महत्त्वाची संवाद बैठक...

Read moreDetails
नांदेड : खुरगाव येथील श्रामणेर प्रशिक्षण केंद्राला सुजात आंबेडकर यांची भेट; वृक्षारोपण उपक्रम

नांदेड : खुरगाव येथील श्रामणेर प्रशिक्षण केंद्राला सुजात आंबेडकर यांची भेट; वृक्षारोपण उपक्रम

August 11, 2026
नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडीची कार्यकर्ता-पदाधिकारी संवाद बैठक संपन्न; सुजात आंबेडकर यांचे उपस्थितांशी थेट संभाषण

नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडीची कार्यकर्ता-पदाधिकारी संवाद बैठक संपन्न; सुजात आंबेडकर यांचे उपस्थितांशी थेट संभाषण

August 11, 2026
नांदेड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेवर वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांचा बहिष्कार

नांदेड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेवर वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांचा बहिष्कार

August 11, 2026
लातूरमध्ये वंचित बहुजन आघाडीची संवाद बैठक उत्साहात; सुजात आंबेडकर यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

लातूरमध्ये वंचित बहुजन आघाडीची संवाद बैठक उत्साहात; सुजात आंबेडकर यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

August 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home