Mental Health : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिलेल्या माहितीनुसार, २०२१ मध्ये जगभरातील १०० कोटींहून अधिक लोक मानसिक विकारांनी त्रस्त होते, म्हणजेच जगातील प्रत्येक ७ पैकी १ व्यक्तीला मानसिक आजार होता. या आकडेवारीमध्ये चिंता आणि नैराश्य यासारख्या विकारांचे प्रमाण सर्वात जास्त होते.
WHO च्या अहवालानुसार, मानसिक विकारांमुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होतो. नैराश्य आणि चिंतेमुळे होणारे वार्षिक आर्थिक नुकसान जवळपास १ ट्रिलियन अमेरिकन डॉलर आहे.
मानसिक आरोग्य आणि गंभीर परिणाम
आत्महत्या : तरुणांच्या मृत्यूचे एक मुख्य कारण आत्महत्या आहे. जगभरात होणाऱ्या प्रत्येक १०० मृत्यूंपैकी १ पेक्षा जास्त मृत्यू आत्महत्येमुळे होतो.
इतर विकार:
- २०० प्रौढांपैकी एकाला स्किझोफ्रेनिया (Schizophrenia) हा गंभीर मानसिक विकार असतो. या विकारावर उपचार करणे अत्यंत खर्चिक आहे.
- १५० प्रौढांपैकी एकाला बायपोलर डिसऑर्डर (Bipolar Disorder) असतो. या विकारामध्ये व्यक्तीच्या मनस्थितीत वेगाने बदल होतो (मूड स्विंग्स).
हे सर्व आकडे ‘ग्लोबल हेल्थ इस्टिमेट्स २०२१’ आणि ‘ग्लोबल बर्डन ऑफ डीसिज, इन्जुरिज अँड रिस्क फॅक्टर्स स्टडी २०२१’ या अहवालांवर आधारित आहेत. कोरोना महामारीनंतर मानसिक आरोग्याच्या स्थितीचा हा पहिलाच अभ्यास आहे, असेही WHO ने स्पष्ट केले आहे. त्यामुळे, मानसिक आरोग्य सेवांमध्ये गुंतवणूक करणे आणि त्या लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
“स्मार्ट सिटी” की “हेल्दी सिटी”?
संजीव चांदोरकर सौंदर्यप्रसाधने चोपडलेला चेहरा ही संपूर्ण शरीर आरोग्य संपन्न ? (आरोग्य संपन्न शरीर असणाऱ्या स्त्री-पुरुषांचा चेहरा देखील चमकदार असतो)...
Read moreDetails