Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

अकोल्यात 61.79 टक्के मतदान

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
April 29, 2024
in राजकीय
0
अकोल्यात 61.79 टक्के मतदान
       

ॲड. प्रकाश आंबेडकर यांना भरभरून मतदान झाल्याचा अंदाज

अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघातील मतदानाच्या अंतिम टक्केवारीत वाढ झाली. मतदारसंघात एकूण मतदान ६१.७९ टक्के झाल्याचे निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे. बाळापूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात मतदान अधिक झाले.

अकोला मतदारसंघातील दोन हजार ०५६ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. नवमतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसून आल्या. सकाळी ७ ते ९ या कालावधीत ७.१७ टक्के मतदान झाले. सकाळी ११ वाजेपर्यंत १७.३९ टक्के, तर दुपारी १ वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी ३२.१५ टक्क्यांवर पोहोचली. दुपारी ३ वाजेपर्यंत ४२.४०, तर ५ वाजेपर्यंत ५२.६९ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

शेवटच्या एका तासात मतदारांनी केंद्रांवर गर्दी केल्याचे दिसून आले. मतदारसंघातील अनेक केंद्रांवर रात्री ८ वाजेपर्यंत मतदान सुरू होते. निवडणूक विभागाकडून रात्री उशिरापर्यंत मतदानाच्या आकडेवारीची जुळवाजुळव करण्यात आली. अधिकृत आकडेवारी शनिवारी जाहीर केली. अकोला मतदारसंघात एकूण मतदान ६१.७९ टक्के झाले आहे. १८ लाख ९० हजार ८१४ मतदारांपैकी ११ लाख ६८ हजार ३४८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानात बाळापूर मतदारसंघात सर्वाधिक ६६.५८, तर अकोला पश्चिममध्ये सर्वात कमी ५४.८७ टक्के मतदान झाले. याशिवाय अकोट ६४.०२, अकोला पूर्व ५९.३६, मूर्तिजापूर ६४.५२ आणि रिसोड मतदारसंघात ६२.४३ टक्के मतदान झाले. २०१९ च्या तुलनेत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारसंघातील मतदानात दोन टक्क्यांनी वाढ नोंदविण्यात आली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे निवडणूक चिन्ह प्रेशर कुकर होते. सर्व समाज घटकांतून ॲड. आंबेडकर यांना मोठ्या प्रमाणात मतदान झाले असून, अकोल्यातील जनता या वेळी ॲड. आंबेडकर यांच्या पाठीशी ठामपणे उभी होती, त्यामुळे वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकर यांचा विजय निश्चित असल्याची भावना वंचितच्या कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.


       
Tags: AkolaLoksabhaParlmentry Election 2024Prakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

वसंत मोरे यांना मिळाले रोड रोलर!

Next Post

सांगलीत विशाल पाटील यांना वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा

Next Post
सांगलीत विशाल पाटील यांना वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा

सांगलीत विशाल पाटील यांना वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
पारस तालुका बाळापूर येथे ढगफुटी! वंचित बहुजन आघाडी जिल्हा पदाधिकाऱ्यांनी दिली भेट!
बातमी

पारस तालुका बाळापूर येथे ढगफुटी! वंचित बहुजन आघाडी जिल्हा पदाधिकाऱ्यांनी दिली भेट!

by mosami kewat
July 24, 2025
0

‎अकोला : अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात असलेल्या पारस गावात नुकत्याच झालेल्या ढगफुटीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने...

Read moreDetails
मेडिकलमधील निष्काळजीपणामुळे बाळाचा मृत्यू – वंचित बहुजन आघाडीची चौकशीची मागणी

मेडिकलमधील निष्काळजीपणामुळे बाळाचा मृत्यू – वंचित बहुजन आघाडीची चौकशीची मागणी

July 24, 2025
दौंड गोळीबार प्रकरणी अजित पवार गटाचे आमदाराच्या भावासह तिघांना अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

दौंड गोळीबार प्रकरणी अजित पवार गटाचे आमदाराच्या भावासह तिघांना अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

July 24, 2025
मनी लाँड्रिंग आणि सार्वजनिक पैशाच्या गैरवापराच्या आरोपांखाली अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर ED चे छापे

मनी लाँड्रिंग आणि सार्वजनिक पैशाच्या गैरवापराच्या आरोपांखाली अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर ED चे छापे

July 24, 2025
डोनाल्ड ट्रम्पचे दावे गंभीर, पंतप्रधान मोदींनी स्पष्टीकरण द्यावे – ॲड. प्रकाश आंबेडकर

डोनाल्ड ट्रम्पचे दावे गंभीर, पंतप्रधान मोदींनी स्पष्टीकरण द्यावे – ॲड. प्रकाश आंबेडकर

July 24, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home