Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

जळगाव जिल्ह्यात 39 किलो ॲम्फेटामाईन ड्रग्स जप्त, आंतरराष्ट्रीय रॅकेटचा संशय

mosami kewat by mosami kewat
July 25, 2025
in बातमी
0
जळगाव जिल्ह्यात 39 किलो ॲम्फेटामाईन ड्रग्स जप्त, आंतरराष्ट्रीय रॅकेटचा संशय

जळगाव जिल्ह्यात 39 किलो ॲम्फेटामाईन ड्रग्स जप्त, आंतरराष्ट्रीय रॅकेटचा संशय

जळगाव : जळगाव जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. चाळीसगाव महामार्ग पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री बोढरे फाटा येथे मोठी कारवाई करत सुमारे 39 किलो ॲम्फेटामाईन हा अत्यंत घातक आणि प्रतिबंधित अंमली पदार्थ जप्त केला आहे. या ड्रग्सची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे 40 ते 50 कोटी रुपये असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, यामागे आंतरराज्यीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय ड्रग्ज नेटवर्क कार्यरत असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
‎
‎गेल्या काही काळापासून जळगाव जिल्ह्यात ड्रग्स प्रकरणांनी जोर धरला आहे. नुकत्याच झालेल्या पावसाळी विधानसभा अधिवेशनातही हे प्रकरण गाजले होते. असे असतानाच ही मोठी कारवाई समोर आली आहे. जिल्ह्यात बाहेरून मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा पुरवठा होत असल्याने अनेक तरुण व्यसनाधीन होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
‎
‎चाळीसगाव महामार्ग पोलिसांनी बोढरे फाट्याजवळ संशयित वाहन थांबवून तपासणी केली असता, त्यांना 39 किलो वजनाचा ॲम्फेटामाईन हा अंमली पदार्थ आढळून आला. पोलिसांनी तात्काळ वाहनचालकाला अटक करून वाहन जप्त केले आहे.
‎
‎
‎प्राथमिक माहितीनुसार, हे ड्रग्स छत्रपती संभाजीनगरमार्गे कर्नाटकातील बंगळुरूकडे नेले जात असल्याची शक्यता आहे. ॲम्फेटामाईन हा पदार्थ प्रामुख्याने विदेशातून तस्करी करून भारतात आणला जातो आणि देशातील तरुण पिढीला व्यसनाधीन करण्यासाठी वापरला जातो, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणात केवळ आंतरराज्यीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील ड्रग्ज नेटवर्कचा सहभाग असल्याची भीती व्यक्त होत आहे.

Tags: Amphetamine seizureDrug traffickingjalgaonracket
Previous Post

‘Saiyaara’ची झपाटलेली भरारी; ८०० वरून थेट २,००० स्क्रीन्सवर प्रदर्शित; लोकप्रियतेमागचं गुपित काय?

Next Post

१० वर्षांत लोकल अपघातात २६ हजारांचा मृत्यू; केवळ १४०० वारसांना मदत, रेल्वेने दिले १०३ कोटी रुपये

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Solapur : चांदणी नदीला पूर, वाहतूक ठप्प; स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमासाठी गावकऱ्यांची धडपड
बातमी

Solapur : चांदणी नदीला पूर, वाहतूक ठप्प; स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमासाठी गावकऱ्यांची धडपड

by mosami kewat
August 17, 2025
0

सोलापूर : सोलापूर येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे गावातील सर्व नद्या-नाल्यांना पूर आला आहे. मांडेगाव चांदणी नदीला आलेल्या मोठ्या पुरामुळे नदीवरील...

Read moreDetails
वंचित, शोषित, पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी निवडणुका लढवणार; धाराशिवमध्ये वंचित बहुजन आघाडीचा निर्धार

वंचित, शोषित, पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी निवडणुका लढवणार; धाराशिवमध्ये वंचित बहुजन आघाडीचा निर्धार

August 17, 2025
सम्यक विद्यार्थी आंदोलन, नाशिक तर्फे महाकवी वामनदादा कर्डक यांना सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे मानवंदना

सम्यक विद्यार्थी आंदोलन, नाशिक तर्फे महाकवी वामनदादा कर्डक यांना सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे मानवंदना

August 17, 2025
अमरावतीत वंचित बहुजन आघाडीची संवाद बैठक; बाळासाहेब आंबेडकर यांचे मार्गदर्शन

अमरावतीत वंचित बहुजन आघाडीची संवाद बैठक; बाळासाहेब आंबेडकर यांचे मार्गदर्शन

August 17, 2025
वंचित बहुजन युवा आघाडीच्या सोलापूर जिल्हा बैठकीत तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग

वंचित बहुजन युवा आघाडीच्या सोलापूर जिल्हा बैठकीत तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग

August 17, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home