वंचित बहुजन आघाडी कडून कारवाईची मागणी.
साक्री, धुळे : धुळे जिल्ह्यातील साक्री येथे मोहिनी नितीन जाधव या ३० वर्षीय महिलेची हत्या करण्यात आली. या हत्येला भाजप नगराध्यक्ष अग्रवाल व त्यासोबतचे समाजकंटक जबाबदार असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आला. मोहिनी जाधव या भटके विमुक्त जाती जमातीतील नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या होत्या.
वंचित बहुजन आघाडीकडून मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात या घटनेची माहिती देण्यात आली आहे. १९ जानेवारी २०२२ रोजी ही घटना घडली. पत्रात दिलेल्या माहितीनुसार ही हत्या जातीय द्वेषातून करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.
भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून हल्ला.
मयत मोहिनी नितीन जाधव यांचे भाऊ रवींद्र राजेंद्र जगताप यांच्यावर भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी हल्ला केला. रवींद्र जगताप यांच्या आई ताराबाई राजेंद्र जगताप साक्री नगरपंचायत निवडणुकीत उभ्या होत्या. भाजप उमेदवाराविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून त्या उभ्या होत्या. रवींद्र जगताप हे भटक्या विमुक्त समाजाचे असूनही मराठ्याच्या समोर निवडणुकीत उभे राहण्याची हिम्मत कशी करतात? आमच्याशी बरोबरी कशी करतात? असे जातीवादी सवाल व शिवीगाळ हल्लेखोर करत होते.
रवींद्र जगताप यांना वाचवण्यासाठी त्यांच्या भगिनी मोहिनी जाधव मध्ये पडल्या. त्यावेळी भाजपच्या जातीवादी हल्लेखोरांनी त्यांची हत्या केली असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
साक्री येथे अशा प्रकारची ही दुसरी घटना आहे. काही दिवसांपूर्वीच राईनपाडा येथे भटक्या विमुक्त समाजातील ५ जणांची हत्या करण्यात आली होती. यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. जातीवादी व गावगुंडांना कायद्याचा धाक राहिला नाही का असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीने उपस्थित केला आहे.
Very good , great work for VBA