Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

हरेगावात १६ वी बौद्ध धम्म परिषद उत्साहात संपन्न; भीमराव आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

mosami kewat by mosami kewat
December 17, 2025
in बातमी, सामाजिक
0
हरेगावात १६ वी बौद्ध धम्म परिषद उत्साहात संपन्न; भीमराव आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती
       

श्रीरामपूर : “न्याय हक्काआड सरकार आले तर बंड करा, पण अन्याय सहन करू नका,” हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ऐतिहासिक संदेश देणाऱ्या हरेगाव (ता. श्रीरामपूर) या स्वाभिमान भूमीत १६ व्या बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

भारतीय बौद्ध महासभा, जिल्हा अहमदनगर (उत्तर) यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. १० दिवसीय श्रामनेर शिबिराचा प्रारंभ या महोत्सवाचा मुख्य भाग म्हणून दि. ७ डिसेंबर २०२५ पासून १० दिवसीय श्रामनेर शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. हरेगाव येथील स्वाभिमान भूमीत हे शिबीर संपन्न झाले.

सकाळी १० वाजता कार्यक्रमाची सुरुवात झाली. महापुरुषांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच शिस्तबद्ध संचलनाद्वारे समता सैनिक दलाने मानवंदना दिली.

या परिषदेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर होते.

यावेळी संस्थेचे ट्रस्टी रिपोर्टिंग चेअरमन ऍड सुभाष जौजाळे, ट्रस्टी राष्ट्रीय उपाध्यक्ष ऍड एस के भंडारे,ट्रस्टी डॉ राजाराम बडवे, राज्याचे अध्यक्ष यु. जी.बोराडे, सरचिटणीस अशोक केदारे, राज्य उपाध्यक्ष उत्तम मगरे , नाशिक विभाग प्रभारी/राज्य संघटक गौरव पवार , तसेच प्रमुख उपस्थिती होते. वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रूपवते आणि भारतीय बौद्ध महासभेचे राज्य व राष्ट्रीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच कार्यकर्ते आणि मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती.

प्रास्ताविक आणि मान्यवरांच्या मार्गदर्शनपर मनोगतानंतर, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे अध्यक्ष शांताराम रणशूर होते. व सूत्रसंचालन नरेंद्र पवार, गौतम पगारे,संतोष बनसोडे यांनी केले. आभार विजय जगताप,बिपीन गायकवाड यांनी केले.

समता सैनिक दलाची जबाबदारी संरक्षण उपाध्यक्ष इंजि अतिष त्रिभुवन यांनी यशस्वी पूर्ण केली.

१६ डिसेंबर १९३९ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी याच भूमीत अन्यायाविरुद्ध लढण्याचा मंत्र दिला होता. त्या ऐतिहासिक स्मृतींना उजाळा देण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते


       
Tags: buddhismBuddhistCampaignDr Babasaheb AmbedkarMaharashtrapoliticsShrirampurVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

आपल्याला काय फरक पडतो? ही आत्मघातकी मानसिकता सोडा; जागतिक अर्थकारण तुमच्या आयुष्यात उतरले आहे!

Next Post

संतापजनक! कर्जाच्या विळख्यात बळीराजाचा ‘बळी’; १ लाखासाठी विकली स्वतःची किडनी

Next Post
संतापजनक! कर्जाच्या विळख्यात बळीराजाचा ‘बळी’; १ लाखासाठी विकली स्वतःची किडनी

संतापजनक! कर्जाच्या विळख्यात बळीराजाचा 'बळी'; १ लाखासाठी विकली स्वतःची किडनी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
औरंगाबादच्या विकासासाठी ‘वंचित’ला साथ द्या; प्रा. अंजली आंबेडकरांचे मतदारांना आवाहन
बातमी

औरंगाबादच्या विकासासाठी ‘वंचित’ला साथ द्या; प्रा. अंजली आंबेडकरांचे मतदारांना आवाहन

by mosami kewat
January 7, 2026
0

प्रभाग क्र. ४ मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत उमटला परिवर्तनाचा सूर ​औरंगाबाद: महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराने आता वेग घेतला आहे. औरंगाबाद...

Read moreDetails
नागपुरात ‘वंचित’ची तोफ धडाडणार; इंदोरा मैदानात आज बाळासाहेब आंबेडकरांची विराट जाहीर सभा

नागपुरात ‘वंचित’ची तोफ धडाडणार; इंदोरा मैदानात आज बाळासाहेब आंबेडकरांची विराट जाहीर सभा

January 7, 2026
अमरावतीच्या विकासाचे ‘व्हिजन’ फक्त वंचितकडेच; सुजात आंबेडकरांचा प्रस्थापितांवर हल्लाबोल

अमरावतीच्या विकासाचे ‘व्हिजन’ फक्त वंचितकडेच; सुजात आंबेडकरांचा प्रस्थापितांवर हल्लाबोल

January 7, 2026
वंचित बहुजन आघाडीच्या मुख्य प्रचार कार्यालयाचे उद्घाटन, सुजात आंबेडकर यांचे मार्गदर्शन

वंचित बहुजन आघाडीच्या मुख्य प्रचार कार्यालयाचे उद्घाटन, सुजात आंबेडकर यांचे मार्गदर्शन

January 7, 2026
अमरावतीत वंचितचा एल्गार; बडनेऱ्यात सुजात आंबेडकरांच्या सभेला जनसमुदायाचा उदंड प्रतिसाद

अमरावतीत वंचितचा एल्गार; बडनेऱ्यात सुजात आंबेडकरांच्या सभेला जनसमुदायाचा उदंड प्रतिसाद

January 7, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home