नांदेड : सावळे परिवाराने त्यांच्या आई स्मृतिशेष अनुसयाबाई नारायणराव सावळे यांच्या पुण्यानुमोदन कार्यक्रम निमित्ताने आंबेडकरी चळवळीचे मुखपत्र ‘प्रबुद्ध भारत’ व वंचित बहुजन आघाडीला 1,00,000/- रुपये (प्रत्येकी पन्नास हजार रुपये) आर्थिक निधी देऊन समाजासमोर एक आदर्श निर्माण केला.
शहरातील धन्वंतरी कॉलनी, दीप नगर येथील कांचन विलास सावळे, अपर्णा कैलाश सावळे व परिवाराने त्यांच्या आई स्मृतिशेष अनुसयाबाई नारायणराव सावळे यांच्या पुण्यानुमोदन दिनी पारंपरिक खर्चाला तिलांजली देऊन बहुजन नायक ॲड. बाळासाहेब आंबेडकरांच्या चळवळीस हा निधी देऊन दानपारमितेचे आपले कर्तव्य पार पाडले.
भंते विनय बोधीप्रिय महाथेरो व भिक्खु संघपाल थेरो यांनी उपासकांना परित्राणपाठ व धम्मदेशना दिली. यावेळी परिवाराने भिक्खू संघाला चिवरदान दिले. ‘राजगृह’ आंबेडकरी चळवळीचे स्फूर्ती केंद्र माणून यापूर्वी ही स्मृतिशेष अनुसयाबाई सावळे यांनी लोकसभा 2019 मध्ये वंचित बहुजन आघाडीला स्वतःची एक महिन्याची पेन्शन दिली होती.
प्रदेश सदस्य तथा प्रशिक्षक प्रा. डॉ. सुरेश शेळके, विभागीय कार्यकारीनी सदस्य डॉ. संघरत्न कु-हे व नांदेड जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश्वर पालमकर यांचे कडे सदरील धनादेश सुपुर्त करण्यात आला. यावेळी भारतीय बौध्द महासभेचे पदाधिकारी, जिल्हा पर्यटन व प्रचार उपाध्यक्ष डॉ. महेंद्र नरवाडे, इतर आप्तेष्ट, नातेवाईक व मित्र मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.