Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

समता महिला शेतकरी गटाने मिळवले आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनचे बक्षीस, वंचितने केला सत्कार

Prabuddh Bharat by Prabuddh Bharat
June 12, 2025
in Uncategorized
0
समता महिला शेतकरी गटाने मिळवले आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनचे बक्षीस,  वंचितने केला सत्कार
       

अकोला – अकोट तालुक्यातील पिलकवाडी या गावातील समता महिला शेतकरी गटाला अभिनेता अमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनचे बक्षिस नुकतेच मिळाले आहे. यानिमित्ताने अकोला जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी समता महिला शेतकरी गटाचा सत्कार पिलकवाडी या त्यांची गावी जाऊन केला. या सत्काराला उत्तर देताना या समता महिला शेतकरी गटातील शेतकरी महिलांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर, अंजली ताई आंबेडकर यांच्यासह अकोला जिल्हा वंचितच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून रासायनिक शेती न करता भरघोस उत्पन्न मिळवणाऱ्या शेतकऱ्यांच्या गटाला बक्षीस जाहीर करण्यात आले आहेत. यासाठी अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातून अनेक शेतकरी गट या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. पीलकवाडी येथील शेतीकरी महिलांनी देखील समता शेतकरी गट तयार करून या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. या समता शेतकरी महिला गटांनी कोणतेही रासायनिक खत न वापरता भरघोस उत्पन्न दिल्याबद्दल या गटाला पाणी फाउंडेशने बक्षिस जाहिर केले होते.

नुकताच पुणे येथील बालेवाडी स्टेडियममध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अनेक सेलिब्रिटींसोबत अभिनेता आमिर खान यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये समता शेतकरी महिला गटाला यासाठी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्हा पदाधिकारी यांनी समता शेतकरी गटाच्या सर्व महिलांचा सत्कार केला आहे. तसेच समता शेतकरी महिला गटाला मार्गदर्शन केलेल्या गावंडे साहेब व सराफ साहेब यांचा देखील सत्कार वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला. यावेळी वंचित बहुजन आघाडी पदाधिकाऱ्यांनी दुर्गम भागातील छोट्या गावात येऊन महिलांना प्रोत्साहन मिळावे म्हणून महिलांचा सत्कार केल्या बद्दल वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकर, अंजली ताई आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. समता शेतकरी महिला गटाच्या वतिने अध्यक्ष पल्लवी ताई मोरदे यांनी वंचितचे आभार मानले आहेत.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचेअकोला जिल्हा अध्यक्ष प्रमोद देंडवे, महासचिव मिलिंद इंगळे, माजी पंचायत समिती सदस्य मुस्ताक भाई, माजी पंचायत समिती सभापती राजू एखे, संजय बुथ, संध्या मोरदे, विद्या मोरोदे, सोनू तायडे, दुर्गा मोरोदे, रूपाली मोरोदे, अश्विनी मोरदे, राहुल लाहोळे, गोपाल ढोरे, संजय खंडारे, शंकर मोरोदे, रमा तायडे, हर्षा मोरोदे, अनिता इंगळे, आशा मोरोदे, दिलीप मोरोदे, उत्तमराव मोरोदे, प्रियंका मोरोदे, प्रदीप पळसपगार, सुयोग आठवले, केशव पाटील, विलास मोडक, संतोष वाघमारे, सुनील वाघमारे, भीमराव तायडे, अमर मोरोदे, नामदेव वाघमारे, राजू वाघमारे, मनोज वाघमारे, राम इंगळे, राजू मोडक, गणेश गवई, गोपाल वाघमारे, यांच्यासह गावातील अनेक महिला पुरुष उपस्थित होते.


       
Tags: Aamir Khan'sawardFarmersfelicitatedFoundationGroupPaanireceivedSamataVanchitWomen
Previous Post

राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होणार, 12 ते 16 जून मुसळधार पावसाची शक्यता

Next Post

पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरला थेट अमेरिकेचं ‘आर्मी डे’च्या कार्यक्रमाचे निमंत्रण

Next Post
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरला थेट अमेरिकेचं ‘आर्मी डे’च्या कार्यक्रमाचे निमंत्रण

पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरला थेट अमेरिकेचं 'आर्मी डे'च्या कार्यक्रमाचे निमंत्रण

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मुंबई आणि पुण्यात Ola-Uber प्रवास ५० टक्क्यांनी महागणार?
बातमी

मुंबई आणि पुण्यात Ola-Uber प्रवास ५० टक्क्यांनी महागणार?

by mosami kewat
July 26, 2025
0

‎मुंबई आणि पुण्यातील अॅप-आधारित टॅक्सी प्रवाशांना लवकरच मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. Ola आणि Uber च्या ड्रायव्हर्सनी केलेल्या संपानंतर राज्य...

Read moreDetails
नालासोपाऱ्यात अनेकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश !

नालासोपाऱ्यात अनेकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश!

July 26, 2025
नांदेड जिल्हा बँकेत सत्ताधारी-विरोधक एकत्र !

नांदेड जिल्हा बँकेत सत्ताधारी-विरोधक एकत्र !

July 26, 2025
निवृत्त होणाऱ्या उपवनरक्षकाकडे १.४३ कोटींची रोकड, सोन्याचा साठा जप्त; निवृत्तीपूर्वीच दक्षता विभागाची कारवाई

निवृत्त होणाऱ्या उपवनरक्षकाकडे १.४३ कोटींची रोकड, सोन्याचा साठा जप्त; निवृत्तीपूर्वीच दक्षता विभागाची कारवाई

July 26, 2025
मुंबई विमानतळावर बॉम्बच्या अफवेने खळबळ: पोलिसांकडून कसून चौकशी सुरू

मुंबई एअरपोर्ट बॉम्बने उडवण्याची धमकी: पोलिसांकडून कसून चौकशी सुरू

July 26, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home