मुंबई – वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौध्द महासभा शाखा सिध्दार्थ कॉलनी, वॉर्ड क्र.१५६ च्या विद्यमाने त्यागमूर्ती महामाता रमाई आंबेडकर यांच्या १२४ व्या जयंती निमित्ताने ७ फेब्रुवारी २०२२ रोजी दक्षिण मध्य मुंबई महिला जिल्हाध्यक्षा सुगंधाताई सोंडे,चेंबूर तालुका महिला अध्यक्षा अंकिताताई गायकवाड, वॉर्ड क्र.१५६ महिला अध्यक्षा सुनिताताई पगारे यांच्या उपस्थितीत मातोश्री रमाबाई आंबेडकर प्रसूतिगृह,चेंबूर येथील प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रसूतिगृह येथील गर्भवती महिलांना फळे व पौष्टिक आहार आणि दिवलीबेन मोहनलाल मेहता (माँ हॉस्पिटल) येथील रूग्णांना फळे वाटप करण्यात आले. त्यावेळी विभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राष्ट्रपतींकडे राजीनामा; घरात रोख रक्कम सापडल्याने चौकशी सुरू
अलाहाबाद : अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी आपल्या पदाचा राष्ट्रपतींकडे तडकाफडकी राजीनामा सोपवला आहे. त्यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणावर...
Read moreDetails






