Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

रुग्णालयांनी अवैध गर्भाशय शस्त्रक्रिया केल्यास गय नाही – आरोग्य मंत्री

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
June 11, 2025
in बातमी
0
रुग्णालयांनी अवैध गर्भाशय शस्त्रक्रिया केल्यास गय नाही – आरोग्य मंत्री
       
मुंबई – अनावश्यक गर्भाशय शस्त्रक्रिया रोखण्यासाठी गर्भलिंग चिकित्सा व निदान (PCPNDT) च्या दक्षता समितीमार्फत नियंत्रण ठेवले जाणार असून, महिलांच्या अवैध व अनावश्यक गर्भाशय शस्त्रक्रिया करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असे आरोग्य मंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांनी म्हटले आहे.
बीड जिल्ह्यातील काही रुग्णालयात महिला ऊसतोड कामगारांच्या अवैध व अनावश्यक गर्भ पिशव्या काढल्या जात असल्या बाबतची बातमी वृत्तपत्रात प्रसिध्द झाली होती. त्या अनुषंगाने बीडमधील या प्रश्नाची आरोग्य मंत्र्यांनी गंभीर दखल घेऊन त्यांचे मंत्रालयीन दालनात बैठक आयोजित केली होती.

ऊसतोड महिला कामगारांच्या गर्भाशय शस्त्रक्रियेचा विषय अत्यंत संवेदनशील व गंभीर असुन, शासनाने घालून दिलेल्या कार्यपद्धतीनुसारच शस्त्रक्रिया होतील याबाबत दक्ष राहण्याचे आदेश आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिले. तसेच अवैध गर्भ पिशव्या काढल्याच्या तक्रारीचे सनियंत्रण करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्याबाबत निर्देश दिले आहेत. अनावश्यक गर्भाशय शस्त्रक्रियेनंतर महिलांना होणाऱ्या दुष्परिणामा बद्दल समाजात व्यापक जनजागृती करण्याच्या सूचना यावेळी दिल्या. महिलांच्या आरोग्याच्या बाबतची कोणतीही चुकीची बाब खपवून घेतली जाणार नसल्याचे यावेळी आरोग्य मंत्री यांनी सांगितले.

तसेच (PCPNDT) कायद्या अंतर्गत खाजगी रुग्णालयाकडून दरमहा अहवाल घेऊन काही अवैध प्रकार घडु नये याबाबत नियंत्रण ठेवले जाते. त्याचप्रमाणे गर्भाशय शस्त्रक्रियेचा अहवालाची विभागाने पडताळणी करावी अशा सुचना दिल्या आहेत. तसेच सर्व वैद्यकिय अधिक्षक,ग्रामीण रुग्णालय स्तरावर सुध्दा गर्भाशय शस्त्रक्रियेस परवानगी देण्याबाबत शहानिशा करण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत.

Tags: HealthHospitalshysterectomyillegalMaharashtraMinistertolerate
Previous Post

बंगळुरू चेंगराचेंगरी दुर्दैवी आणि दुःखद – राहुल द्रविड

Next Post

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर वंचितची माढा लोकसभा विभाग आढावा बैठक

Next Post
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर वंचितची माढा लोकसभा विभाग आढावा बैठक

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर वंचितची माढा लोकसभा विभाग आढावा बैठक

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
पुण्यात वंचित बहुजन महिला आघाडीतर्फे ‘भारतीय स्त्री मुक्ती परिषद’ संपन्न; मनुस्मृती दहन दिनानिमित्त विचारांचा जागर
Uncategorized

पुण्यात वंचित बहुजन महिला आघाडीतर्फे ‘भारतीय स्त्री मुक्ती परिषद’ संपन्न; मनुस्मृती दहन दिनानिमित्त विचारांचा जागर

by mosami kewat
December 25, 2025
0

पुणे : "भीक नको सत्तेची, सत्ता हवी हक्काची" ही गर्जना करत वंचित बहुजन महिला आघाडी, पुणे शहर यांच्यावतीने आज २५...

Read moreDetails
सोलापुरात आठवले गटाला धक्का; युवा शहर अध्यक्ष सुमित शिवशरण यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश!

सोलापुरात आठवले गटाला धक्का; युवा शहर अध्यक्ष सुमित शिवशरण यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश!

December 25, 2025
सक्षम ताटे हत्या प्रकरण: पोलीस कारवाईच्या मागणीसाठी आचल ताटे अन् मातेचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

सक्षम ताटे हत्या प्रकरण: पोलीस कारवाईच्या मागणीसाठी आचल ताटे अन् मातेचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

December 25, 2025
वंचित बहुजन आघाडी आक्रमक! केज पंचायत समितीच्या कामचुकार कारभाराचा ‘हार’ घालून निषेध

वंचित बहुजन आघाडी आक्रमक! केज पंचायत समितीच्या कामचुकार कारभाराचा ‘हार’ घालून निषेध

December 25, 2025
कष्टकरी महिला आणि कोल्हाटी समाजाचा आवाज सभागृहात ; ‘वंचित’ चा जामखेड पॅटर्न चर्चेत !

कष्टकरी महिला आणि कोल्हाटी समाजाचा आवाज सभागृहात ; ‘वंचित’ चा जामखेड पॅटर्न चर्चेत !

December 24, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home