मंगळवारी आयोजन
पुणे – डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या संशोधन विभागामार्फत मांग-गारुडी समाजासाठी विशेष मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा मंगळवारी (दि. २२) सकाळी १० वाजता, “काळभोर लॉन्स”, लोणी काळभोर, पुणे येथे होणार आहे.
या कार्यशाळेत समाज कल्याण विभाग, जात पडताळणी प्रक्रिया, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागांमार्फत उपलब्ध योजनांबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे. तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ यांच्यामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
बार्टीमार्फत चालवल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षा, आय.बी.पी.एस., पोलीस व मिलिटरी भरतीपूर्व प्रशिक्षण, यू.पी.एस.सी. अभ्यासक्रम व संविधान विषयक मार्गदर्शनही यामध्ये करण्यात येणार आहे.
या उपक्रमात मांग-गारुडी समाजातील सर्व बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.