अकोला : महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांना महाराष्ट्र गोसेवा आयोगाने राज्यभर जनावरांचे बाजार भरवू नयेत असे आदेश दिले आहेत. दि 29 एप्रिल रोजी गोसेवा आयोगाने काढलेल्या
पत्रकात ईद-उल-अजहा 2025 च्या पार्श्वभूमीवर राज्यभर जनावरांचे बाजार भरवू नयेत, असे अधिकार नसताना बेकायदेशीर आदेश दिले आहेत. जनावरांचा बाजार भरवला नाही तर केवळ गोवंश नव्हे तर बकरे, म्हशी, शेळ्या यांसारखी कोणतीही बंदी नसलेली जनावरेही गरजवंत शेळी मेंढी पालक व शेतकऱ्यांना विकता येणार नाहीत.
सध्या शेतीचे पेरणीचे दिवस असून शेतकऱ्यांना बी बियाणे विकत घेण्याकरिता शेतकरी अडचणीत असताना अनेक शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून शेळी, मेंढी पालन करून या उत्पन्नातून शेती पेरणीकरिता बी बियाणे विकत घेतात. परंतु महाराष्ट्र गोसेवा आयोग यांनी बेकायदेशीर पत्र काढून जनावराचे बाजार बंद केल्यामुळे अनेक शेतकरी अडचणीत आले आहेत. या गोसेवा आयोगाच्या आदेशाविरोधात आज वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्यावतीने जिल्हाधिकारी अकोला यांना महाराष्ट्र गोसेवा आयोग यांनी अधिकार नसताना बाजार समितीला दिलेला आदेश तात्काळ रद्द करून जनावरांचा बाजार पूर्ववत सुरू करा अशी मागणी केली आहे.
यावेळी वंचितचे जिल्हा समन्वयक अॅड.नतीकउद्दीन खतीब, प्रमोद देंडवे, मिलिंद इंगळे, पी.जे.वानखडे, ज्ञानेश्वर सुलताने, गोपाल कोल्हे, आम्रपालीताई खंडारे, श्रीकांत घोगरे, धीरज इंगळे, राजकुमार दामोदर, मजहदर खान, कलीम भाई, गजानन गवई, अॅड.अनवर शेरा, सुनील इंगळे, रऊफ पैलवान, शब्बीर भाई, अलीमुद्दीन भाई, नंदकुमार डोंगरे, राहुल अहिरे, आकाश शिरसाट, अशोक शिरसाठ, किशोर जामणीक, पवन बुटे, हाजी मंजहरखान, लक्ष्मीताई वानखडे, अनुराधा डांगे, डॉ.धर्माळ सपकाळ, साबीर भाई, विकास सदांशिव, शाहिद भाई, अक्षय तायडे, अमोल जामणीक, दीपक सावंत, सचिन शिराळे, जय तायडे, निलेश इंगळे, वैभव खडसे, प्रेमराज भटकर, गवई गुरुजी यांच्यासह अकोला वंचितचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थित होते.
बाळासाहेब आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; चौघांवर परभणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
परभणी : औरंगाबाद येथे २४ ऑक्टोबर २०२५ रोजी वंचित बहुजन आघाडीने RSS कार्यालयावर 'जन आक्रोश मोर्चा' काढल्यानंतर सोशल मीडियावर बाळासाहेब...
Read moreDetails






