Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

मणिपूरात पुन्हा हिंसाचार, 5 जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

Prabuddh Bharat by Prabuddh Bharat
June 9, 2025
in Uncategorized
0
मणिपूरात पुन्हा हिंसाचार, 5 जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू
       
मणिपूर – मणिपूरमध्ये सीबीआयने मैतेई गटाच्या नेत्या अरामबाई टेंगगोलला अटक केल्यानंतर पुन्हा हिंसाचार सुरु झाला आहे. त्यामुळे मणिपूरमधील पाच जिल्ह्यात रवीवारी रात्री इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. तसेच प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.

याबाबत सीबीआयने एक निवेदन जारी केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, शनिवारी रात्री अरामबाई टेंगगोलला ताब्यात घेतल्याच्या बातम्या पसरताच, निदर्शने उसळली. तेव्हा इम्फाळ शहराच्या विविध भागात टायर जाळले आणि रस्ते अडवले. क्वाकीथेल परिसरात सुरक्षा दल आणि निदर्शकांमध्ये चकमक झाली. यावेळी अनेक निदर्शक जखमी झाले आहेत.

मणिपूरचे गृह आयुक्त एन. अशोक कुमार यांनी इंटरनेच सेवा 5 दिवस बंद ठेवण्यासह प्रतिबंधात्मक आदेश दिले आहेत. त्यानुसार रविवारी पहाटे इंफाळ पूर्व आणि पश्चिम, काकचिंग, थौबल आणि बिष्णुपूर या 5 जिल्ह्यांमध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू झाले. यानुसार व्हीएसएटी आणि व्हीपीएन सेवांसह इंटरनेट आणि मोबाइल डेटा सेवा 5 दिवसांसाठी निलंबित करण्यात आल्या आहेत.

तर गृह विभागाने दिलेल्या आदेशात “काही समाजविरोधी घटक सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात प्रतिमा, द्वेषपूर्ण भाषण आणि द्वेषपूर्ण व्हिडिओ संदेश प्रसारित करण्यासाठी करू शकतात. ज्यामुळे लोकांच्या भावना भडकतील आणि मणिपूर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतात.” असे गृह विभागाने म्हटले आहे.

Tags: 5 districtsbreaksimposedmanipurordersout againprohibitoryViolence
Previous Post

स्पेनचा कार्लोस अल्कराज फ्रेंच ओपनचा विजेता ; ग्रँड स्लॅम स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा विजेतेपद

Next Post

तब्बल 32 वर्षांनी साताऱ्यात होणाार 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

Next Post
तब्बल 32 वर्षांनी साताऱ्यात होणाार 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

तब्बल 32 वर्षांनी साताऱ्यात होणाार 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी बजावला मतदानाचा हक्क
बातमी

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी बजावला मतदानाचा हक्क

by mosami kewat
January 15, 2026
0

अकोला : लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवात आज वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई...

Read moreDetails
महानगरपालिका निवडणुकीत ‘गॅस सिलेंडर’ चिन्हावर मतदान करा; प्रकाश आंबेडकरांचे जनतेला आवाहन

महानगरपालिका निवडणुकीत ‘गॅस सिलेंडर’ चिन्हावर मतदान करा; प्रकाश आंबेडकरांचे जनतेला आवाहन

January 14, 2026
नवोदय विद्यालयातील विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; प्रकाश आंबेडकरांनी घेतली पाटोळे कुटुंबाची भेट

नवोदय विद्यालयातील विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; प्रकाश आंबेडकरांनी घेतली पाटोळे कुटुंबाची भेट

January 14, 2026
वंचितची गर्जना! आंबेडकरी नेतृत्वाचा झंझावात; ४ ते १३ जानेवारीदरम्यान सभांचा महासंग्राम, जनसागरामुळे विरोधक हादरले

वंचितची गर्जना! आंबेडकरी नेतृत्वाचा झंझावात; ४ ते १३ जानेवारीदरम्यान सभांचा महासंग्राम, जनसागरामुळे विरोधक हादरले

January 14, 2026
नाशिकमध्ये खळबळ: वंचितच्या उमेदवाराच्या भावाला बेदम मारहाण; ‘प्रस्थापित’ घाबरल्याचा जिल्हाध्यक्षांचा आरोप

नाशिकमध्ये खळबळ: वंचितच्या उमेदवाराच्या भावाला बेदम मारहाण; ‘प्रस्थापित’ घाबरल्याचा जिल्हाध्यक्षांचा आरोप

January 14, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home