पुणे : पर्वती विधानसभा मतदारसंघातील आई माता चौक, गंगाधाम येथे वारंवार होणाऱ्या अपघातांना आळा बसावा यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. या ठिकाणी ११ जून रोजी दिपाली सोनी या तरुणीचा दुर्दैवी अपघात होऊन मृत्यू झाला होता. याआधीही अनेक अपघात या चौकात झाले असून, तरीही प्रशासनाकडून योग्य ती कायमस्वरूपी उपाययोजना केली जात नाही, अशी जोरदार टीका आंदोलकांनी केली. आंदोलनादरम्यान प्रशासनाला ठोस उपाययोजना कराव्यात व मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर करण्यात यावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली. या आंदोलनात वंचित बहुजन आघाडी पर्वती विधानसभेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उपस्थित मान्यवरांमध्ये: शहराध्यक्ष मा. ॲड. अरविंद तायडे, महिला आघाडी शहराध्यक्ष मा. अनिताताई चव्हाण, माथाडी आघाडी अध्यक्ष मा. अजय भालशंकर, विश्वास गदादे, विकास भेगडे पाटील, मा. शामभाऊ गोरे, प्रतिभा कांबळे, संदीप चौधरी, परमेश्वर सनादे, नितीन कांबळे, तौफिक पठाण, ओंकार कांबळे, अभिजीत बनसोडे, बिपीन लोंढे, विजय साळवे, सलमान पठाण, बंटी डोलारे, परशुराम बनसोडे, विनोद धावारे, विशाल गायकवाड, दत्ता शेंडगे, हरी वाघमारे, अक्षय कांबळे, प्रदीप कांबळे, महेश शिंगे, राजरत्न गाडे, शैलेंद्र भिडे, मनिषाताई ओव्हाळ, कांताताई पानतावने, सारिकाताई भोसले, शोभाताई गायकवाड, कल्पनाताई गायकवाड, ज्योतीताई कांबळे यांचा सहभाग होता.
अकोल्यात धनगर समाजातील युवकांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश!
अकोला : अकोला जिल्ह्यातील धनगर समाजाचे युवा नेते आणि कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये सामील होत पक्षाला बळकटी दिली आहे. यामध्ये...
Read moreDetails