Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

अखेर पायउतार ! महाराष्ट्राच्या गृहमंत्राचा राजीनामा

Jitratn Usha Mukund Patait by Jitratn Usha Mukund Patait
October 20, 2022
in बातमी
0
अखेर पायउतार ! महाराष्ट्राच्या गृहमंत्राचा  राजीनामा
       

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला. मुंबई पोलीस कमिशनर परमबिरसिंह यांनी त्यांच्यावर केलेल्या १०० कोटींच्या वसुलीच्या आरोपामुळे राज्यात खळबळ माजली होती. या प्रकरणी निष्पक्ष तपास होण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने राज्य सरकार बरखास्त करुन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विश्वासातील म्हणुन ओळखले जाणारे एनकाउंटर स्पेशलीस्ट सचिन वाझे यांना एनआयने केलेल्या अटके नंतर अनिल देशमुख यांच्या अडचणीत अधिक वाढ झाली होती.

सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. जयश्री पाटील यांनी दाखल केलेल्या याचीकेवर सुनवाई करताना मुंबई ऊच्च न्यायालयाच्या खंडपीठाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय दिला. या आरोप प्रकरणी सीबीआयला १५ दिवसात प्राथमिक अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. निर्णयानंतर अन्य कोणताही पर्याय शिल्लक नसलेल्या अनिल देशमुख यांनी नैतिकतेच्या मुद्दा पुढे करत मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला. दरम्यान मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात अनिल देशमुख सुप्रिम कोर्टात अपिल करणार आहेत. अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या गृहमंत्री पदावर मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते व उत्पादन शुल्क आणि कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांची नेमनूक केली आहे.


       
Tags: anildeshmukhCBImaharashtrgovernmentNIAprambirsingh
Previous Post

परिवर्तन वाद्यांचे थांबण्याचे ठिकाण ?

Next Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती संदर्भात अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे जनतेला आवाहन !

Next Post
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती संदर्भात अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे जनतेला आवाहन !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती संदर्भात अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे जनतेला आवाहन !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
बौद्ध तरुणाच्या मारहाण प्रकरणी खामगावात तीव्र निषेध
बातमी

बौद्ध तरुणाच्या मारहाण प्रकरणी खामगावात तीव्र निषेध

by mosami kewat
July 26, 2025
0

खामगाव : गाय चोरीच्या आरोपावरून एका बौद्ध तरुणाला निर्वस्त्र करून बेदम मारहाण केल्याच्या निषेधार्थ खामगावात बौद्ध समाजाने आज वंचित बहुजन...

Read moreDetails
कोल्हापूर जिल्ह्यात बनावट नोटा रॅकेटचा पर्दाफाश; बांगलादेश सीमेपर्यंत पोहोचले धागेदोरे

कोल्हापूर जिल्ह्यात बनावट नोटा रॅकेटचा पर्दाफाश; बांगलादेश सीमेपर्यंत पोहोचले धागेदोरे

July 26, 2025
कळमनुरी PMKSY घोटाळा: VBA चे 'थाळी बजावो' आंदोलन, १५ ऑगस्टपर्यंत कारवाईची मागणी

कळमनुरी PMKSY घोटाळा: VBA चे ‘थाळी बजावो’ आंदोलन, १५ ऑगस्टपर्यंत कारवाईची मागणी

July 26, 2025
बीडमध्ये 'होडी चलाव' आंदोलन: धानोरा रोडच्या दुरवस्थेवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक

बीडमध्ये ‘होडी चलाव’ आंदोलन: धानोरा रोडच्या दुरवस्थेवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक

July 26, 2025
"केवळ गोरंट्याल नव्हे; राष्ट्रवादीचेही अनेक नेते भाजप प्रवेशासाठी उत्सुक काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा खुलासा"

राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजप प्रवेशासाठी उत्सुक काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा खुलासा

July 26, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home