Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

अकोला जिल्हा परिषदेतील नियमबाह्य पदोन्नतीवर वंचित बहुजन युवा आघाडीचा आक्षेप; बदली रद्द करण्याची मागणी

Tanvi Gurav by Tanvi Gurav
June 28, 2025
in बातमी, विशेष
0
"अकोला जिल्हा परिषदेतील नियमबाह्य पदोन्नतीवर वंचित बहुजन युवा आघाडीचा आक्षेप; बदली रद्द करण्याची मागणी"

"अकोला जिल्हा परिषदेतील नियमबाह्य पदोन्नतीवर वंचित बहुजन युवा आघाडीचा आक्षेप; बदली रद्द करण्याची मागणी"

       

अकोला: अकोला जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन अधीक्षक पदावर नियमानुसार रिक्त होण्याआधीच झालेल्या नियुक्तीबाबत वंचित बहुजन युवा आघाडीने तीव्र आक्षेप नोंदवत मुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.

संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र पातोडे यांनी असा इशारा दिला आहे की, जर हे प्रकार थांबवले गेले नाहीत तर आम्ही आमच्या यादीप्रमाणे वंचित बहुजन समाजातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची बदली व पदोन्नती करावी, अशी मागणी करू. या प्रकरणात विशेष बाब म्हणजे, १ जुलै २०२५ रोजी रिक्त होणाऱ्या अधीक्षक (सामान्य प्रशासन) पदावर दोन महिने अगोदरच गिरीश मोगरे यांची नियमबाह्य नियुक्ती करण्यात आली आहे.

हे सर्व प्रशासनातील काही निवडक अधिकाऱ्यांनी शासन निर्णय व नियम धाब्यावर बसवून केले असल्याचा आरोप वंचित बहुजन युवा आघाडीकडून करण्यात आला आहे. गिरीश मोगरे यांची बदली मुर्तिजापूर पंचायत समितीतून थेट जिल्हा परिषद बांधकाम विभागात करण्यात आली, आणि नंतर त्यांची अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली. विशेष म्हणजे, या पदावर कार्यरत असलेले सुनील जानोरकर हे शिक्षण विभागात होते, त्यांचीही नियमानुसार बदली झालेली नव्हती.

यासोबतच जानोरकर यांच्यावर महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक छळासंदर्भात गुन्हा दाखल असूनही, अद्याप त्यांना निलंबित करण्यात आलेले नाही, यावरही संघटनेने गंभीर आक्षेप घेतला आहे. या प्रकाराला “शासकीय नियमांची थट्टा” संबोधत वंचित बहुजन युवा आघाडीने प्रशासनाला इशारा दिला आहे की, जर असा पक्षपाती व नियमबाह्य व्यवहार सुरूच राहिला, तर संपूर्ण वंचित बहुजन समाजात असंतोष उसळेल आणि तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.




       
Tags: AkolavbaforindiaWomen
Previous Post

कोचिंग क्लासमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; फरार आरोपींना राजकीय वरदहस्त कोणाचा?

Next Post

Beed : पाटोद्यात वंचित बहुजन आघाडीचे जागरण गोंधळ आंदोलन; प्रशासनाकडे ९ प्रमुख मागण्या सादर

Next Post
Beed : पाटोद्यात वंचित बहुजन आघाडीचे जागरण गोंधळ आंदोलन; प्रशासनाकडे ९ प्रमुख मागण्या सादर

Beed : पाटोद्यात वंचित बहुजन आघाडीचे जागरण गोंधळ आंदोलन; प्रशासनाकडे ९ प्रमुख मागण्या सादर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Somanath Suryawanshi case : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी पोलिसांवर गुन्हे नोंदवण्याचे आदेश
बातमी

Somanath Suryawanshi case : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी पोलिसांवर गुन्हे नोंदवण्याचे आदेश

by mosami kewat
July 4, 2025
0

कोठडीतील मृत्यूबाबत न्यायालयाचा हा महत्वपूर्ण निर्णय : ॲड. प्रकाश आंबेडकर पुणे : परभणीमध्ये संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर त्या विरोधात आंदोलन...

Read moreDetails
सुरज वाघंबरे यांच्या कुटुंबियांचे बाळासाहेब आंबेडकर यांनी केले सांत्वन

सुरज वाघंबरे यांच्या कुटुंबियांचे बाळासाहेब आंबेडकर यांनी केले सांत्वन

July 4, 2025
बीडमध्ये ‘शिवभोजन’ थाळीत भ्रष्टाचार: एकाच थाळीवर अनेक लाभार्थींचे फोटो काढून निधी लाटल्याचा आरोप‎‎

बीडमध्ये ‘शिवभोजन’ थाळीत भ्रष्टाचार: एकाच थाळीवर अनेक लाभार्थींचे फोटो काढून निधी लाटल्याचा आरोप‎‎

July 4, 2025
भाजप आणि काँग्रेस दोघेही बौद्ध विरोधी, राष्ट्र विरोधी - ॲड. प्रकाश आंबेडकर

भाजप आणि काँग्रेस दोघेही बौद्ध विरोधी, राष्ट्र विरोधी – ॲड. प्रकाश आंबेडकर

July 4, 2025
महाबोधी मुक्ती आंदोलनासाठी सुजात आंबेडकर उद्या बोधगया (बिहार) जाणार! ‎

महाबोधी मुक्ती आंदोलनासाठी सुजात आंबेडकर उद्या बोधगया (बिहार) जाणार! ‎

July 4, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क