Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

बेहिशेबी मालमत्ता आणि भ्रष्टाचारप्रकरणी माजी रोखपालला 10 वर्षांची शिक्षा

Prabuddh Bharat by Prabuddh Bharat
June 7, 2025
in बातमी
0
बेहिशेबी मालमत्ता आणि भ्रष्टाचारप्रकरणी माजी रोखपालला 10 वर्षांची शिक्षा
       

मुंबई –

बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याच्या आरोपाप्रकरणी राज्य विधिमंडळ सचिवालयातील माजी रोखपालाला विशेष न्यायालयाने दहा वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. मनोज गावकर असे त्याचे नाव आहे. त्याने 1991 ते 2004 या कालावधीत राज्य विधिमंडळ सचिवालयात रोखपाल म्हणून कार्यरत असताना सरकारी निधीचा गैरव्यवहार केला होता. लाचलुचपत खात्याच्या चौकशीत त्याने तब्बल 52 लाख 35 हजाराहून अधिक रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे समोर आले. त्यामुळे मनोज गावकर याला या प्रकरणी दोषी ठरवून विशेष न्यायालयाने 10 वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

मनोज गावकर याच्यावर 2013 साली लाजलुचपत खात्याने गुन्हा दाखल केला होता. विशेष न्यायलयाचे न्यायाधीश एस ई बांगर यांनी या प्रकरणी मनोज गावकर याला 10 वर्षांची शिक्षा व 50 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. मनोज गावकर यांनी सरकारी सेवक असताना 52 लाखाहून अधिक रुपयांचा भ्रष्टाचार केला. तसेच गावकर यांनी बेहिशोबी मालमत्ता बाळगली व त्याचा हिशोब तो न्यायालयाला देऊ शकला नाही. याप्रकरणी त्याला दोषी विशेष न्यायलयाने दोषी ठरवून दहा वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा दिली आहे.


       
Tags: 10 yearsassetsFormerprisonsentencedtreasurerundeclared
Previous Post

रिझर्व बॅकेकडून सलग तिसरी व्याजदर कपात, अर्धा टक्के व्याजदर कपातीमुळे कर्जदारांना दिलासा

Next Post

बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात आरसीबीच्या ‘निखिल सोसाळें’सह 3 जणांना अटक

Next Post
बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात आरसीबीच्या ‘निखिल सोसाळें’सह 3 जणांना अटक

बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात आरसीबीच्या 'निखिल सोसाळें'सह 3 जणांना अटक

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सोलापूर हादरले! भाविकांची पिकअप विहिरीत कोसळून 14 जणांचा मृत्यू; आर्थिक मदत देण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी
बातमी

सोलापूर हादरले! भाविकांची पिकअप विहिरीत कोसळून 14 जणांचा मृत्यू; आर्थिक मदत देण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

by mosami kewat
June 15, 2026
0

सोलापूर : माळशिरस तालुक्यात रविवारी घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. म्हसवड–पंढरपूर मार्गावरील तांदूळवाडी गावाजवळ भाविकांना...

Read moreDetails
बॉटम ऑफ पिरॅमिड मधील भावा बहिणीसाठी !

बॉटम ऑफ पिरॅमिड मधील भावा बहिणीसाठी!

June 15, 2026
नांदेडमध्ये 21 वे आंबेडकरवादी साहित्य संमेलन उत्साहात संपन्न; प्रा. अंजलीताई आंबेडकर यांचे मार्गदर्शन

नांदेडमध्ये 21 वे आंबेडकरवादी साहित्य संमेलन उत्साहात संपन्न; प्रा. अंजलीताई आंबेडकर यांचे मार्गदर्शन

June 15, 2026
सोनखेड येथील मृत सादेख अली यांच्या कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकरांनी घेतली भेट

सोनखेड येथील मृत सादेख अली यांच्या कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकरांनी घेतली भेट

June 14, 2026
अकोल्यात ग्राहकांना विश्वासात न घेता स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन; निलेश देव यांचा महावितरणला इशारा

अकोल्यात ग्राहकांना विश्वासात न घेता स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन; निलेश देव यांचा महावितरणला इशारा

June 14, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home