वंचित बहुजन युवा आघाडीचे तीन दिवसीय ‘राज्य स्तरीय प्रशिक्षण शिबीर’ उस्फुर्त सहभागाने संपन्न.
शिर्डी – युवक आघाडी बांधणी आणि कृती कार्यक्रम अंतर्गत वंचित बहुजन युवा आघाडीचे शिर्डी येथील “राज्य स्तरीय प्रशिक्षण शिबीर दिनांक ७ ते १० मार्च २०२२ रोजी कुंदन लॉन्स, राहता, शिर्डी येथे आयोजित करण्यात आले होते. राज्यभरातून निमंत्रित युवा शक्तीच्या प्रचंड प्रतिसादात आयोजित प्रशिक्षण शिबीराचे उदघाटन एड बाळासाहेब आंबेडकर ह्यांनी केले. पक्षाच्या भूमिकेची स्पष्टता, क्षमता आणि नितीमत्ता असणारी कार्यकर्त्यांची फळी ही राजकीय पक्षाच्या बांधणीतील आणि पुढील वाटचालीतील महत्वाचा घटक असल्याने संविधानाची मुल्ये, त्याचा राजकीय, सामाजिक आणि व्यक्तिगत व्यवहारातील वापर, स्वातंत्र्य, समता आणि सामाजिक न्याय ह्या मुल्यांची स्पष्टता, पक्षाची तत्वप्रणाली आणि विविध प्रश्नांसंबंधी पक्षाच्या भूमिकांचे आकलन महत्वाचे आहेत. नेतृत्व करण्याची, विविध समाज घटकांबरोबर संवाद साधण्याची क्षमता, लोकांना संघटित करण्याची पक्षाशी जोडण्याची, टिकवण्याची क्षमता कायर्कर्त्यांमध्ये विकसित करणे. विविध वंचित समूहाचे प्रश्न ओळखून त्यावरती आंदोलन, प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासन वेळप्रसंगी दबाव टाकणे, माध्यमांबरोबर संवाद आणि ह्या क्षमता कार्यकर्त्यांमध्ये असणे अपेक्षित आहे. ह्याच उद्देशाने युवा आघाडी कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते.
फुले-आंबेडकरी विचारसरणी आणि पक्षाच्या भूमिका आपल्या राजकीय, सार्वजानिक आणि व्यक्तिगत जीवनातील वर्तनातून लोकांसमोर जाणे, पक्षाकडे युवकांना आकर्षित करणे आणि पक्षाच्या भुमिकांशी सुसंगत कार्यक्रम घेत राहणे ही आव्हाने व भूमिका समर्थपणे निभावण्यासाठी जाणीवपूर्वक प्रशिक्षित कार्यकर्ते पदाधिकारी घडविण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ह्यावेळी बोलताना एड बाळासाहेब आंबेडकर ह्यांनी नव्या पिढीला मार्गदर्शन करणारे उद्बोधन केले. ह्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून रेखाताई ठाकूर- प्रदेश अध्यक्षा, वंचित बहुजन आघाडी, निलेश विश्वकर्मा युवा प्रदेश अध्यक्ष, वंचित बहुजन युवा आघाडी प्रामुख्याने उपस्थित होते. शिबिराची प्रस्तावना प्रा. अंजली आंबेडकर ह्यांनी केले तर विविध सत्राचे सूत्रसंचालन- राजेंद्र पातोडे, महासचिव युवा आघाडी, रविकांत राठोड,प्रदेश सदस्य युवा आघाडी व.ब.आ, शमीभा पाटील प्रदेश सदस्य युवा आघाडी व.ब.आ, चेतन गांगुर्डे प्रदेश सदस्य युवा आघाडी व.ब.आ, विश्वजीत कांबळे प्रदेश सदस्य युवा आघाडी व.ब.आ, यांनी केले.
ज्येष्ठ नेते शांताराम बापू पंदेरे, प्रा. प्रतिमा परदेशी,प्रदेश उपाध्यक्ष डॉ धैर्यवर्धन पुंडकर,प्रदेश उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष दिशा पिंकी शेख, राज्य उपाध्यक्ष व प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे,प्रदेश प्रवक्ता एड प्रियदर्शी तेलंग, प्रदेश उपाध्यक्ष सर्वजीत बनसोडे, भास्कर भोजने, जितरत्न पटाईत, एड अरुण जाधव, कश्यप जगताप, उद्योजक, राजू झोडे, चंद्रपूर प्रामुख्याने उपस्थित होते.
शिबीर यशस्वी करण्यासाठी निरीक्षक तथा प्रदेश युवा सदस्य ऋषिकेश नांगरे पाटील, प्रदेश युवा सदस्य अॅड. सचिन जोऱे, प्रदेश युवा सदस्य शामिभा पाटील, प्रदेश युवा सदस्य अक्षय बनसोडे, प्रदेश युवा सदस्य चेतन गांगुर्डे, प्रदेश युवा सदस्य विशाल गवळी, वंचित ज़िल्हाध्यक्ष विशाल कोळगे, वंचित जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे, युवा जिल्हाध्यक्ष प्रवीण आल्हाट, युवा जिल्हाध्यक्ष संतोष जठार, अप्पासाहेब मकासरे, विशाल लोंढे, जीतूभाऊ जाधव, गौतमदादा पगारे, महेश कांबळे, विवेक लोंढे ह्यांनी परिश्रम घेतले.