Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

जिल्हा परिषद निवडणुकांचे वेळापत्रक बदलले! पाहा मतदान आणि मतमोजणीची नवीन तारीख

mosami kewat by mosami kewat
January 29, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
जिल्हा परिषद निवडणुकांचे वेळापत्रक बदलले! पाहा मतदान आणि मतमोजणीची नवीन तारीख
       

पुणे : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडू एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या मतदानाची तारीख आता पुढे ढकलण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे राज्यात जाहीर करण्यात आलेल्या 3 दिवसांच्या शासकीय दुखवट्यामुळे हा बदल करण्यात आला आहे. यामुळे 12 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. 5 फेब्रुवारी 2026 ऐवजी आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान; तर 7 फेब्रुवारी 2026 ऐवजी 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. (zilla parishad panchayat samiti election)

राज्य निवडणूक आयोगाने या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी 13 जानेवारी 2026 रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार नामनिर्देशनपत्र दाखल करणे, नामनिर्देशनपत्र मागे घेणे, चिन्ह वाटप आणि निवडणूक लढविणाऱ्या अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे इत्यादी टप्प्यांच्यी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यापुढील मतदान, मतमोजणी आणि निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करणे हे टप्पे शिल्लक आहेत.

निवडणुकांच्या कार्यक्रमातील उर्वरित टप्प्यांमध्ये बदल

सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकांसाठी 31 जानेवारी 2026 च्या पुढे फक्त दोन आठवड्यांची मुदत वाढ दिली आहे; परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी अपघाती निधन झाल्यामुळे राज्य शासनाने राज्यात 28 जानेवारी 2026 ते 30 जानेवारी 2026 पर्यंत दुखवटा जाहीर केला आहे. या कालावधीचा विचार करून जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या कार्यक्रमातील उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार संबंधित जिल्हाधिकारी सुधारित निवडणूक कार्यक्रमाची सूचना 31 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध करतील. (zilla parishad panchayat samiti election)

नवा निवडणूक कार्यक्रम काय आहे?

आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. त्यामुळे जाहीर प्रचाराची समाप्ती 5 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 10 वाजता होईल. संबंधित ठिकाणी 9 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरु होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणची आचारसंहिता संपुष्टात येईल. निवडून आलेल्या सदस्यांची नावे शासन राजपत्रात 11 फेब्रुवारी 2026 पर्यंत प्रसिद्ध केली जातील.


       
Tags: Ajit PawarBaramaticmElectioElection campaignElection commissionElection date updateMaharashtraMaharashtra electionPoliticalpolticspuneVanchit Bahujan Aaghadivbaforindiazilla parishad panchayat samiti election
Previous Post

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात सायली चक्रे ‘सुवर्ण पदका’ची मानकरी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
जिल्हा परिषद निवडणुकांचे वेळापत्रक बदलले! पाहा मतदान आणि मतमोजणीची नवीन तारीख
बातमी

जिल्हा परिषद निवडणुकांचे वेळापत्रक बदलले! पाहा मतदान आणि मतमोजणीची नवीन तारीख

by mosami kewat
January 29, 2026
0

पुणे : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडू एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या मतदानाची तारीख आता...

Read moreDetails
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात सायली चक्रे ‘सुवर्ण पदका’ची मानकरी

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात सायली चक्रे ‘सुवर्ण पदका’ची मानकरी

January 29, 2026
UGC समानता कायदा मध्ये ओबीसी समाविष्ट होताच ‘मंडल’ काळातील विरोधक पुन्हा रस्त्यावर !

UGC समानता कायदा मध्ये ओबीसी समाविष्ट होताच ‘मंडल’ काळातील विरोधक पुन्हा रस्त्यावर !

January 29, 2026
UGC च्या समानता नियमांना स्थगिती म्हणजे सामाजिक न्यायाला धक्का : ॲड. प्रकाश आंबेडकर

UGC च्या समानता नियमांना स्थगिती म्हणजे सामाजिक न्यायाला धक्का : ॲड. प्रकाश आंबेडकर

January 29, 2026
कोलंबियात लँडिंगदरम्यान प्रवासी विमान कोसळले; १५ जणांचा मृत्यू

कोलंबियात लँडिंगदरम्यान प्रवासी विमान कोसळले; १५ जणांचा मृत्यू

January 29, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home