वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने आयोजित भव्य युवा अभिवादन रॅली काल मोठ्या उत्साहात संपन्न झाली त्यामध्ये आदरणीय अंजलीताई आंबेडकर या प्रामुख्याने उपस्थित होत्या त्यांच्या सोबतच पार्लमेंटरी बोर्ड सदस्य अशोक भाऊ सोनवणे, वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र भाऊ पातोडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य पुष्पाताई इंगळे महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रभाती शिरसाट हे सुद्धा उपस्थित होते.
नेहरू पार्क जवळील हुतात्मा स्मारक येथे आद. अंजलीताई आंबेडकर,अशोक भाऊ सोनवणे, राजेंद्र भाऊ पातोडे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून रॅली सुरुवात करण्यात आली, रॅलीमध्ये सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असलेला सुंदर देखावा असलेला रथ त्या पाठोपाठ अंजलीताई आंबेडकर स्वार असलेली ओपन जीप आणि त्यामागे प्रथम युवतींच्या मोटरसायकल आणि त्यानंतर युवकांच्या मोटरसायकल असा रॅलीचा क्रम होता, सिविल लाईन चौक मार्गे नेकलेस रोड, दुर्गा चौक, अग्रसेन चौक, अकोट स्टॅन्ड, तिलक रोड, सिटी कोतवाली, गांधी रोड, बस स्टॅन्ड मार्गे पोस्ट ऑफिस समोरून अशोक वाटिकेमध्ये सदर रॅली ही सांगता करण्यात आली.रॅलीमध्ये मोठ्या संख्येने युवक युवती आपल्या मोटरसायकल घेऊन सहभागी झाले होते.