Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home विशेष

समाजमाध्यमांची भुरळ; तरुण भाईगिरीच्या विळख्यात !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 27, 2022
in विशेष
0
समाजमाध्यमांची भुरळ; तरुण भाईगिरीच्या विळख्यात !
       

सध्या देशाची परिस्थिती बघता तरुणांच्या संभ्रमतेला जबाबदार कोण आहे? याचा प्रत्यय येणे फार कठीण आहे. वेगवेगळ्या भूमिका असलेल्या नकारात्मक – सकारात्मक हिरॉईजमच्या नादात एक सलग पिढी बरबाद होतांना दिसत आहे. समाज माध्यमांवर लाखो फॉलोअर्स, लाईक असणारे तथाकथित भाईंनी उच्छाद मांडला आहे. नुकतंच थेरगाव क्वीनच प्रकरण घडून गेलंय. सोशल मीडियावरील भाईगिरी, स्टेटस, अश्लील भाषा, शिव्या देणे, फॉलोअर्सच्या मागे धावणे यालाच नव तरुण खऱ्या आयुष्यात फॉलो करायला लागलेत. सातवी नापास असणाऱ्या “हिंदुस्थानी भाई” त्यांना त्यांचा मसीहा वाटतोय ही चिंताजनक गोष्ट आहे. कोणीतरी सोशल मीडिया वरून आवाहन करून राज्यभरातील तरुणांना एकत्र करतो, मुलं त्याला जमतात अन पोलिसांना, सरकारला त्याची खबरबात नसणं ही गोष्ट धक्कादायक होती.

सिने तारकांनी साकारलेल्या नकारात्मक भूमिका, त्यांचे संवाद हे सर्रास स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग म्हणून वापरले जात असताना दिसत आहे. ते संवाद अनेकांना प्रेरणादायी वाटत असल्याने, त्यांचा वाढता प्रभाव बघता तरुणांच्या -विद्यार्थ्यांच्या दिशा या चुकीच्या दिशेने वेगाने जात आहे. मागे प्रदर्शित झालेला स्कॅम – १९९२ बाबत ही असचं काहीसं वातावरण होतं. एक वास्तवातील नकारार्थी पात्र डोक्यावर घेतलं जातं होतं. जर आपण सूक्ष्म निरीक्षण केले तर जाणवेल की या पात्राचा प्रभाव तरुण मनांवर जाणवत होता. परंतु हर्षद मेहता बाबतचं हे घडलं नसून याधी ही शूट आऊट ऍट लोखंडवाला पासून तर अनेक चित्रपटांचे संवाद तरुणांच्या तोंडात खेळत होते. त्यांच त्या पत्रांबाबतच आकर्षण लक्षात घेता तरुणांच्या हिंस्त्र आणि गुन्हेगारी वृत्तीत झालेली वाढ जाणवत होती.

प्रसारमाध्यमे, सिनेक्षेत्र आणि समाज माध्यम या सर्व बाबींनी तरुणांना घेरलं आहे. या संभ्रमित अवस्थेत हिरॉइझमचे निकष न समजलेल्या पिढीसमोर आपला ‘आदर्श’ न ठरवता येण्यामुळे ‘हिंदुस्थानी भाऊ’ हा उभा झाला आहे. याच्या ‘प्रसिद्ध होण्यामागची कारणे नेमकी काय?’ हा शोध अद्याप ही सरकारने मुळापासून घेतलेला नाही. त्यामुळे रस्त्यावर उरलेल्या विद्यार्थ्यांच्या नजरेत पुन्हा तो ‘पिट्या भाई’ ठरला असेल का? हा मुख्य प्रश्नावर सरकारने फार गांभीर्याने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.

देशातील वाढता कोरोना संसर्ग आणि या काळात शिक्षणाबाबत फसलेल्या नीति ही ‘हिंदुस्थानी भाऊ’ नामक विचाराला पोसण्यास जबाबदार आहे. तसेच हे सर्व इमेज बिल्ड अप करण्यासाठी वापरलेले हातकंडे आहे याबाबत कुठलही दुमत नाही, परंतु विद्यार्थ्यांमध्ये हा विचार पटण्या इतपत प्रक्रिया झाली आणि त्यामुळे रस्त्यावर कायदा सुव्यवस्था बिघडली. परीक्षा सोडून आंदोनात सहभागी झाल्याबद्दल हिंदुस्थानी भाऊच्या समर्थनार्थ दिलेली एका विद्यार्थ्यांची बाईट मनात किती कालवा करणारी आहे? याच गांभीर्य प्रत्येक आंदोलक विद्यार्थ्यांच्या पालकांना आलेलं आहे.

राज्यात सुव्यवस्था राखण्यासाठी जबाबदारी सरकार आणि गृहखात्याची आहे. तहान लागल्यावर पाणी शोधण्याच्या वृत्तीमुळे हिंदुस्थानी भाऊ आणि त्या सारख्या अनेकांना लाईटली घेतले गेले आहे. कॅरी मिण्डा बाबत ही असचं पुढे नवं काही पहिला मिळालं तर नवल नसेल परंतु, गृहमंत्रालय आणि पोलीस खाते यांची ही लापरवाही इतकी नडली की दहावी – बारावीची पोरं रस्त्यावर अराजकता निर्माण करू लागली.

पुढे या प्रकरणात पालकांनी या विकास पाठक (हिंदुस्थानी भाऊ) ला जबर सुनावले असले, तरी ही समाज माध्यमांवर त्याला अनेकांनी सपोर्टिव्ह भूमिका घेतल्या आहे. त्यांचा उद्देश ही तसाच दिसत असतांना भविष्याला घेऊन अपेक्षित कृती सरकार मार्फत होत नाहीये. समाज माध्यमांवर चाललेला भोंगळ कारभार राज्यातील सुव्यवस्था भंग करण्यास कारण असतांना यांच्यावर जबर बसण्यास कोणत्या मर्यादांना सामोरे जाण्याची सरकारला भिती आहे? हाही यानिमित्ताने प्रश्न पडत आहे.

कोरोना संक्रमणामुळे समाजात सामाजिक आणि मानसिक बदल प्रचंड झाले आहे. वैफल्यग्रस्तता, न्यूनगंड, एकलकोंडी वृत्ती, इंटरनेटचा अतिवापर यातुन निघण्याचा नवा मार्ग सर्व शोधत आहे. जग रुटिंग पुन्हा लागत असल्याचे चित्र जाणवत असतांना विद्यार्थी आणि तरुणांना सोबत घेऊन जाणे हेही तितकेच गरजेच आहे. या देशाला प्रत्येक पर्वात एक मसिहा लाभला आहे. आपली आदर्श स्थान त्यांना पटवून सन्मार्गाने उभं करण्याची गरज आहे. यासाठी पालकांच्या जबाबदारी आणि सरकारची कर्तव्य ही फार महत्वाची बाब आहे. जेणेकरून उद्या पुन्हा एखाद्या हिंदुस्थानी भाऊला परत समज देण्यासाठी पालकांना पोलीस ठाण्याची पायरी चढण्याची वेळ यायला नको.

संविधान गांगुर्डे, नाशिक


       
Previous Post

हिजाब, दंगल, धार्मिक ध्रुवीकरण !

Next Post

लहुजींचे ब्राह्मणीकरण थांबवा !

Next Post
लहुजींचे ब्राह्मणीकरण थांबवा !

लहुजींचे ब्राह्मणीकरण थांबवा !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मटण, दारू नाही तर विकासाला मत द्या; सुजात आंबेडकर यांचे आवाहन
बातमी

मटण, दारू नाही तर विकासाला मत द्या; सुजात आंबेडकर यांचे आवाहन

by mosami kewat
December 1, 2025
0

नागपूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक-२०२५ च्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी नागपूर जिल्ह्यातील कामठी...

Read moreDetails
नागपूर दौरा :सीताबर्डी येथे सुजात आंबेडकरांच्या हस्ते वंचित बहुजन आघाडीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

नागपूर दौरा :सीताबर्डी येथे सुजात आंबेडकरांच्या हस्ते वंचित बहुजन आघाडीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

December 1, 2025
अमेरिकेतील वाढता ‘प्रेडिक्शन मार्केट’ सट्टा-भारताच्या तरुणांसाठी धोक्याची घंटा?

अमेरिकेतील वाढता ‘प्रेडिक्शन मार्केट’ सट्टा -भारताच्या तरुणांसाठी धोक्याची घंटा?

December 1, 2025
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा -ॲड. प्रकाश आंबेडकर

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा -ॲड. प्रकाश आंबेडकर

December 1, 2025
‎’लोकशाहीची खिल्ली उडवली जात आहे’, ‘शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष’ : सुजात आंबेडकरांचा आरएसएस, सरकारवर हल्लाबोल !‎‎

‎’लोकशाहीची खिल्ली उडवली जात आहे’, ‘शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष’ : सुजात आंबेडकरांचा आरएसएस, सरकारवर हल्लाबोल !‎‎

December 1, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home