Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समितीची स्थापना

mosami kewat by mosami kewat
August 12, 2025
in Uncategorized, बातमी
0
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समितीची स्थापना

न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समितीची स्थापना

उत्तरप्रदेश : अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांना पदावरून हटवण्याच्या मागणीसंदर्भात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी एक चौकशी समिती स्थापन केली आहे. न्यायमूर्तींवरील आरोपांची ही समिती चौकशी करेल.
‎
‎न्यायाधीश चौकशी अधिनियम १९६८ अंतर्गत समितीची स्थापना
‎
‎मंगळवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाच्या कामकाजादरम्यान या समितीची घोषणा केली. न्यायाधीश चौकशी अधिनियम १९६८ च्या कलम तीनच्या उपकलम दोननुसार न्यायमूर्ती वर्मा यांना पदावरून हटवण्याच्या मागणीच्या आधारांची चौकशी ही तीन सदस्यीय समिती करेल.
‎
‎या समितीमध्ये उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरविंद कुमार, मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती मनिंदर मोहन श्रीवास्तव आणि कर्नाटक उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील बी.व्ही. आचार्य यांचा समावेश आहे. समिती लवकरात लवकर आपला अहवाल सादर करेल. अहवाल येईपर्यंत हा प्रस्ताव प्रलंबित राहील, असे बिर्ला यांनी स्पष्ट केले.
‎
‎या वर्षी मार्च महिन्यात न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या सरकारी निवासस्थानी आग लागली होती. आग विझवताना त्यांच्या आउटहाऊसमधून जळालेल्या नोटांचे अनेक बंडल सापडले होते. तथापि, न्यायमूर्ती वर्मा यांनी या नोटांबद्दल माहिती नसल्याचे म्हटले होते. याच घटनेनंतर, केंद्र सरकार न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांना न्यायव्यवस्थेतून बाहेर काढण्यासाठी सभागृहात प्रस्ताव आणेल अशी चर्चा सुरू झाली होती.

संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी प्रस्ताव आणण्यासाठी खासदारांच्या सह्या घेण्यास लवकरच सुरुवात केली जाईल, असे सांगितले होते. तसेच, बहुतेक राजकीय पक्षांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिल्याचेही त्यांनी म्हटले होते.

Tags: AllahabadElection Commission of IndiaHC judgeUttar Pradesh
Previous Post

‘काही चुका होणं स्वाभाविक’ जिवंत लोकांना मृत दाखवल्याच्या दाव्यावर सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाचं अजब उत्तर

Next Post

मुंबई म्युनिसिपल कामगार संघाच्या मागणीनंतर पालिका प्रशासन कराराचा पुनर्विचार करणार – प्रकाश आंबेडकर

Next Post
मुंबई म्युनिसिपल कामगार संघाच्या मागणीनंतर पालिका प्रशासन कराराचा पुनर्विचार करणार - प्रकाश आंबेडकर

मुंबई म्युनिसिपल कामगार संघाच्या मागणीनंतर पालिका प्रशासन कराराचा पुनर्विचार करणार - प्रकाश आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
बातमी

गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

by mosami kewat
September 11, 2026
0

औरंगाबाद : समाज कल्याण विभागाच्या गारखेड येथील मागासवर्गीय मुलींच्या जुन्या वसतिगृहातील वॉर्डन साधना सहाने आणि तेथील वॉचमन यांच्या कथित गैरवर्तनाविरोधात...

Read moreDetails
जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

September 11, 2026
आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

September 11, 2026
MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

September 11, 2026
भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

September 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home