परळी: वंचित बहुजन युवा आघाडी परळीच्या वतीने प्रबुद्ध भारत पाक्षिकाचे घर तिथे प्रबुद्ध भारत अंतर्गत प्रबुद्ध भारत सभासद नोंदणी अभियान वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शैलेंद्र भैय्या कांबळे यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. आज परळी येथे झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वंचित बहुजन युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष राजेश सरवदे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रजावती ताई कांबळे, शहराध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा हनुमंत वाघमारे सर, तालुका अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा विलास रोडे सर, स्वप्निल कांबळे डिव्हिजनल ऑफिसर समता सैनिक दल इत्यादी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक वंचित बहुजन व आघाडीचे युवा नेते देवानंद गायकवाड यांनी केले तसेच प्रबुद्ध भारत बहुजन चळवळीसाठी किती आवश्यक आहे आणि प्रबुद्ध भारत काळाची का गरज आहे प्रबुद्ध भारत या पक्षाचे वर्गणीदार व सभासद होणे किती महत्त्वाचे आहे यावर विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
प्रबुद्ध भारत सभासद नोंदणी अभियान हे 10 मार्च ते दहा मे या कालावधीत परळी तालुक्यातील संपूर्ण गावांमध्ये राबविण्यात येणार असून प्रत्येक गावामध्ये प्रबुद्ध भारतचे वाचक आणि सभासद जास्तीत जास्त करण्याचा संकल्प यावेळी युवा आघाडीच्या माध्यमातून करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंचित बहुजन व आघाडीचे शहराध्यक्ष प्रेम जगतकर यांनी केले आणि आभार प्रदर्शन जोंधळे यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वंचित बहुजन व आघाडीचे सर्व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.