पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जे पत्रक प्रसिद्ध केले आहे. ज्यामध्ये आंदोलन सभा कार्यक्रम घेण्यासाठी आठ दिवस अगोदर पूर्व परवानगी घ्यावी असा उल्लेख आहे. हे परिपत्रक मागे घेण्यात यावे अन्यथा आंदोलन करू असा इशारा सम्यक विद्यार्थी आंदोलन, पुणे यांनी दिला आहे.
तसेच विद्यापीठाच्या या पत्रकामुळे भारतीय राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा हे पत्रक गळचेपी करणारे असल्याचे सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी हे पत्रक मागे घेतले नाही तर वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन पुणे शहर यांच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करू असा इशारा विद्यापीठ कुलगुरू यांना पत्राद्वारे करण्यात आला.
यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलन पुणे शहर अध्यक्ष चैतन्य प्रभाकर इंगळे, महासचिव जान्हवी कोमल सचिन शेलार, उपाध्यक्ष प्रज्योत गायकवाड हे उपस्थित होते.