Prabuddh Bharat
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home विशेष चळवळीचा दस्तऐवज

दस्तऐवज चळवळीचा : “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तिरंगा का फडकवत नाही?” खा. बाळासाहेब आंबेडकरांच्या प्रश्नाने लोकसभेत गोंधळ

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
August 14, 2022
in चळवळीचा दस्तऐवज, विशेष
0
बाळासाहेब आंबेडकरांना 4-5 दिवसात हॉस्पिटल मधून डिस्चार्ज, दीड ते दोन महिने भेटीसाठी सक्त मनाई
0
SHARES
594
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
       

नवी दिल्ली (१६ ऑगस्ट २०००) : स्वातंत्र्यदिनी नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्य कार्यालयावर तिरंगा ध्वज न फडकवल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे खासदार बाळासाहेब आंबेडकर यांनी लोकसभेत करताच आज प्रचंड गोंधळ झाला. भाजप तसेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सदस्य आणि विरोधी पक्ष यांच्यात जोरदार शाब्दिक चकमकी उडाल्या.

लोकसभेत शून्य तासाला खा. बाळासाहेब आंबेडकर यांनी संघाच्या नागपूर येथील मुख्य कार्यालयावर तिरंगा फडकवण्यात आला नसल्याचे सभागृहाच्या लक्षात आणून दिले. जे तिरंगा ध्वज मानत नाहीत, त्या संघ परिवारातील लोकांबरोबर आपण सरकारमध्ये राहणार काय? असा प्रश्न खा. आंबेडकर यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील अन्य घटक पक्षांना विचारला. ते पुढे म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नोव्हेंबर १९४९ साली त्या वेळचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यात एक करार झाला होता. त्यानुसार राजकीय कैद्यांची तुरुंगातून मुक्तता करण्याचे ठरले व संघाने प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिनाला तिरंगा ध्वज आपल्या कार्यालयावर फडकवावा, असेही ठरले. त्यानुसार २६ जानेवारी १९५० रोजी पहिल्या स्वातंत्र्य दिनाला संघाने राष्ट्रध्वजारोहण केले; पण त्यानंतर संघाने कधीही तिरंगा फडकविला नाही.

बाळासाहेब आंबेडकर यांच्या भाषणात भाजपचे अनेक सदस्य अडथळे आणत होते, तरीही त्याला न जुमानता खास. बाळासाहेब म्हणाले, १९९८ मध्ये झालेल्या एका सर्व पक्षीय बैठकीत, जर संघाने आपणहून तिरंगा फडकवला नाही, तर आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जाऊन संघाच्या मुख्य कार्यालयावर तिरंगा फडकवावा, असा त्या बैठकीत निर्णय झाला. त्यानुसार गेल्या वर्षी नागपूर येथे संघाच्या मुख्य कार्यालयावर पोलिसांनी लाठिमार केला व त्यात १५ जण जखमी झाले. यंदाच्या वर्षीही काही कार्यकर्ते संघाच्या कार्यालयावर राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी काल गेले होते. पण त्यांना रोखण्यात आले.

देशाचे पंतप्रधान वाजपेयी, गृहमंत्री अडवाणी, मनुष्यबळ विकासमंत्री डॉ. मुरली मनोहर जोशी, हे सारे जण आपण संघाचे आहोत व संघ आपला आत्मा आहे, असे सांगत असतात. जो संघ तिरंगा ध्वजाचा आदर राखत नाही, त्या संघाबद्दल सरकारची भूमिका काय आहे, हे सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी केली. बाळासाहेब संघावर अशी टीका करत असताना सत्ताधारी पक्षातून विजयकुमार मल्होत्रा, राजीवप्रताप रुढी, अशोक प्रधान, विजय गोयल, मोहन रावले, शिवराज चौहान, आदी सदस्य हे खा. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आरोपांना जोरदार आक्षेप घेऊ लागले, तर कॉंग्रेस व डाव्या पक्षांचे सदस्य हे बाळासाहेबांनी मांडलेल्या मुद्द्याचे समर्थन करू लागले. जयपाल रेड्डी, प्रियरंजनदास मुन्शी, विलास मुत्तेवार, वासुदेव आचार्य, रामदास आठवले, रघुवंश प्रसाद सिंग, आदी सदस्य सत्ताधारी सदस्यांना प्रत्त्युत्तर देत होते.

संसदीय कामकाज मंत्री प्रमोद महाजन हे बाळासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना म्हणाले, मी लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे. संघावर वाटेल तसे आरोप करून कोणी त्याचा राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न करू नये. स्वातंत्र्य दिनाला किंवा प्रजासत्ताक दिनाला कोणीही व्यक्ती वा संघटना तिरंगा फडकवू शकते. पाहिजे तर आपण पुढील वर्षी बाळासाहेब आंबेडकर यांना नागपूरला बरोबर घेऊन जाऊ व त्यांच्या हस्ते संघाच्या मुख्य कार्यालयावर ध्वजारोहण करू, अशी तयारी त्यांनी दर्शविली.

रिपब्लिकन पक्षाचे खा. रामदास आठवले हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घाला, अशा घोषणा देत होते.

बाळासाहेब आंबेडकर-आठवले यांचे संघावर आरोप चालू असतानाच प्रमोद महाजन म्हणाले, तुम्ही ज्यांचे नाव घेत आहात, त्यांनीच राष्ट्रध्वज जाळला होता, याची आठवण करा. (महाजनांनी असा शेरा का मारला, हे कुणालाच कळले नाही. कारण आंबेडकर किंवा आठवले यांनी कोणाचे नावच घेतले नव्हते.)


बाळासाहेब यांनी आवाहन केल्याप्रमाणे भा.ब. महासंघ नेते मा. राजाभाऊ ढाले व अनेक कार्यकर्त्यांनी मुंबईसह नागपूर, कोल्हापूर, आदी ठिकाणी संघ कार्यालयावर तिरंगा फडकविला. नागपूरला पोलिसांनी लाठीचार्ज केला गेला. त्याचबरोबर दादर, मुंबई येथील डॉ. आंबेडकर भवन येथे भा.ब. महासंघाच्यावतीने तिरंगा ध्वजवंदन करण्यात आले.


राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रध्वज वंदन का करीत नाही?मुंबईच्या संघ कार्यालयावर ध्वज लावून राजाभाऊ ढाले यांचा आक्षेप !

१५ ऑगस्ट हा दिवस म्हणजे तमाम भारतीय जनतेने अथक प्रयत्नातून प्राप्त केलेल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्याचे प्रतीक आहे. या दिवशी सारे राष्ट्र भारतीय ध्वजाला विनम्रपणे अभिवादन करीत असते. मात्र स्वत:ला प्रखर राष्ट्रवादी म्हणवून घेणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ १५ ऑगस्ट हा दिवस साजरा करीत नाही आणि या प्रश्नाचे उत्तरही तो चलाखीने टाळत आहे. रा.स्व.संघासारख्या शक्तींचा दुटप्पीपणाचा बुरखा फाडण्यासाठी व भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील तमाम जनतेप्रती आदरभावना व्यक्त करण्यासाठी आज दि. १५ ऑगस्ट २००० या स्वातंत्र्य दिनी भा.ब.महासंघाच्यावतीने रा.स्व.संघ कार्यालयावर तिरंगा राष्ट्रध्वज फडकविण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. राष्ट्रवादी म्हणवून घेणा-या रा.स्व.संघाने स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्ताने आपल्या चिंतनात आणि वर्तनात आमूलाग्र बदल करावा. देशभर चाललेलेले विद्वेषाचे आणि सूडाचे राजकारण पूर्णत: सोडावे, असे आवाहन भा.ब.महासंघाचे नेते राजाभाऊ ढाले यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे. दादरच्या संघ कार्यालयावर संघाने स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रध्वजारोहन न केल्याबद्दल भा.ब.महासंघ कार्यकर्त्यांनी मा.राजाभाऊ ढाले यांच्या नेतृत्वाखाली ध्वजारोहन केले. त्यानंतर प्रसिध्द केलेल्या पत्रकात हे आवाहन करण्यात आले आहे.

पत्रकात पुढे म्हटले आहे की, महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्य लढ्याच्या काळात रा.स्व.संघाने विरुध्द भूमिका घेतली होती. त्यावेळी संघ समाजातील कोणत्या सामाजिक घटकांचे प्रतिनिधित्व करीत होता? खोटा शत्रू सातत्याने समोर उभा करून कायम युध्दजन्य, असुरक्षिततेच्या मानसिकतेत ठेवण्याचे व स्वत:चे गुप्त हितसंबंध बिनबोभाटपणे साधण्याचे कट कारस्थान संघ कायम आखत आला आहे. त्यामुळेच भारताचे पहिले गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांनी संघाला राष्ट्रविरोधी म्हटले आहे. स्वातंत्र्यानंतर १४ नोव्हेंबर १९४८ रोजी भारत सरकारने गृहमंत्रालयाच्यावतीने एक प्रेस नोट प्रसिध्द केली होती. त्यात संघ हा Anti national (राष्ट्रविरोधी) आहे, असे स्पष्टपणे लिहिले होते. त्यानंतर ३० जानेवारी १९४८ रोजी संघ परिवारातील नथुराम गोडसेने कट करून भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे प्रतीक असलेल्या महात्मा गांधींचा खून केला. त्यामुळे राष्ट्रविरोधी असल्याचे सिध्द झाले. तरीही भारतीय परंपरेनुसार २६ जानेवारी १९५० या प्रजासत्ताक दिनी कुणावरही बंदी असू नये, या उदात्त हेतूने संघावरील बंदी १९४९ साली उठविली. त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या बरोबर संघाने एक समझोता केला होता. त्या करारातील एक अट अशी होती की, संघाच्या त्यांच्या घटनेतून व कृतीतून भारतीय राज्यघटना आणि तिरंगा राष्ट्रध्वज यांच्याविषयीचा त्यांचा आदर व बाधिलकी नि:संशयरित्या दाखवून दिली पाहिजे. (The R.S.S. leader has undertaken to make tha loyalty to the Union Constitution and respect for the National Flag more explicit in the constitution of the R.S.S., Govt. communiqué dated 11th July 1949, announcing the lifting of ban page 205, Rashtriya Swayamsevak Sangha : Deshraj Goyal, New Delhi) ही अट संघावर का घालण्यात आली होती? या नंतरही संघाने १५ ऑगस्ट हा भारतीय स्वातंत्र्य दिन आणि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन कधीही साजरे केले नाहीत. किंबहुना हे दु:खद दिन म्हणून उल्लेख करतात. (संदर्भ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघास खुले पत्र- एड. खा. बाळासाहेब आंबेडकर आणि त्या पत्राला खुले उत्तर मा.गो.वैद्य, प्रकाशक – ब.श.दाते, भारतीय विचार साधना, पुणे. डिसेंबर, १९९३) याचा अर्थ भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील जनतेचे योगदान व त्यातून विकसित झालेली भारतीय राज्यघटना रा.स्व.संघाला मान्य नाही, असाच निघतो. किंबहुना त्यामुळेच भारतीय जनतेचे मानबिंदू आणि राज्यघटना आमूलाग्रपणे बदलण्याची पावले संघ परिवाराकडून उचलली जात आहेत. संघाची ही चाल भारतीय जनतेने ओळखली पाहिजे व आपल्या मानबिंदूचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी संघटितपणे व जागृतपणे प्रयत्नशील राहिले पाहिजे, असे आवाहन भारिप बहुजन महासंघ या निमित्ताने करीत आहे.

संघाच्या मुंबई येथील कार्यालयावर ध्वजारोहण करण्याचे नेतृत्व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आयु. राजाभाऊ ढाले यांनी केले.

(संदर्भ : प्रबुध्द भारत, संपा. खास. बाळासाहेब आंबेडकर, अंक: ३१ ऑगस्ट २०००, पान -१,२)


       
Tags: bjpNational flagPrakash Ambedkarrss
Previous Post

Makiko Oya

Next Post

आंबेडकरी चळवळीतील निष्ठावंत भिम सैनिक तुकारामजी डोंगरे कालवश.

Next Post
आंबेडकरी चळवळीतील निष्ठावंत भिम सैनिक तुकारामजी डोंगरे कालवश.

आंबेडकरी चळवळीतील निष्ठावंत भिम सैनिक तुकारामजी डोंगरे कालवश.

दलालांनी घेरले, आंबेडकरांनी तारले !
सामाजिक

दलालांनी घेरले, आंबेडकरांनी तारले !

- आकाश मनीषा संतराम स्थळ परभणी. 10 डिसेंबर 2024. मंगळवारचा दिवस होता. पूर्वेला सूर्याची लाली आली होती. कुणी कामावर जाण्याच्या ...

February 15, 2025
सिद्धार्थ कॉलेजमुळेच मी सुप्रीम कोर्टात जज होऊ शकलो !
विशेष

सिद्धार्थ कॉलेजमुळेच मी सुप्रीम कोर्टात जज होऊ शकलो !

कालकथित सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांनी वेळोवेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आभार मानले आहेत. ते ज्यावेळी कुर्ला येथे ...

February 15, 2025
शब्दांनो, थोडे मोठे व्हा…बा भीमा – रमाईची प्रेमकहाणी तुमच्यात मावत नाही..!
विशेष

शब्दांनो, थोडे मोठे व्हा…बा भीमा – रमाईची प्रेमकहाणी तुमच्यात मावत नाही..!

- आकाश मनिषा संतराम संपूर्ण जगभरात आजचा दिवस म्हणजे 14 फेब्रुवारी हा व्हॅलेंटाइन डे म्हणून साजरा केला जातो. विशेषतः तरुण ...

February 14, 2025
तथागत गौतम बुध्द आणि संत रविदासांचा – रोहिदासीया धर्म
सामाजिक

तथागत गौतम बुध्द आणि संत रविदासांचा – रोहिदासीया धर्म

प्रा. डॉ. गणेश बोरकर संत रोहीदास हिंदू नव्हते त्यांनी विज्ञानवादी रोहीदासीया समाजाची रचना केली आहे. ६२३ वर्षापूर्वी संत रोहीदासांनी मांडलेली ...

February 14, 2025
धस साहेब….तर तुम्ही अशाच पद्धतीने माफ केलं असतं का?
बातमी

धस साहेब….तर तुम्ही अशाच पद्धतीने माफ केलं असतं का?

सोमनाथ सुर्यवंशीच्या आईचा सवाल ! परभणी : सोमनाथच्या मारेकर्‍यांना माफ करा, असे आ.सुरेश धस साहेब तुम्ही कसे काय म्हणू शकता? ...

February 11, 2025
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क