- संजीव चांदोरकर
आम्ही बोललो की “या डाव्यांना फक्त भांडवलशाहीला विरोध करणे माहित आहे” अशी टीका होते.
पण जागतिक कॉर्पोरेट आणि वित्त भांडवलशाहीच्या एखाद्या नेत्याने भांडवलशाही प्रणालीवर स्वतः टिका केली की ते किती ग्रेट विचारवंत आहेत…म्हणत टाळ्या वाजवणार
ब्लॅकरॉक भारतासकट अनेक देशात कार्यरत आहे. तिच्याकडे असलेले ॲसेट अंडर मॅनेजमेंट १२ ट्रिलियन डॉलर्स आहेत. ती जगातील सर्वात मोठी इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे
भारताची जीडीपी जेमतेम साडेतीन ट्रिलियन डॉलर्स आहे. भारतातील म्युच्युअल फंडाकडे असलेले ॲसेट अंडर मॅनेजमेंट जेमतेम एक ट्रिलियन डॉलर्स भरतील. यावरून ब्लॅकरॉकचा महाकाय पणा समजेल.
लॅरी फिंक, BlackRock या अमेरिका स्थित गुंतवणूक कंपनीचे संस्थापक आणि कार्यकारी संचालक आहेत.
नुकत्याच संपलेल्या दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये फिंक म्हणाले की
“अर्थव्यवस्था नीट काम करत आहे की नाही हे तपासण्यासाठी जीडीपी आणि मार्केट कॅपिटलायझेशन हे निकष असू शकत नाहीत”.
ते पुढे म्हणाले की “जगातील सामान्य लोकांचा भांडवलशाही प्रणाली बद्दलचा अविश्वास दिवसेंदिवस वाढत आहे”.
वाजवा टाळ्या. आणि किती ग्रेट, किती ग्रेट म्हणत एकमेकांची पाठ थोपटा
बहुराष्ट्रीय भांडवलाची, मल्टिनॅशनल कंपन्यांची खरेतर फाटली आहे. ट्रम्प प्रणित अतिरेकी राष्ट्रवाद सर्व राष्ट्रात फोफावणे आता अपरिहार्य आहे. कारण ती क्रिया प्रतिक्रियांची साखळी असेल. त्यातून बहुराष्ट्रीय भांडवल अन् नेशन स्टेट असा तणाव तयार होणार.
Larry Fink त्या भांडवलाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांना परिस्थिती हाताबाहेर जाईल अशी चिंता आहे. ही चिंता ग्लोबल एलिट मध्ये पसरत आहे.
ज्या परिस्थितीवर ते टीका करू पाहतात ती परिस्थिती नक्की कशातून आली त्याच्या कारणाने मध्ये जाण्यात त्यांना रस नाही. उपाययोजना करणे म्हणजे स्वतःच्या हितसंबंधांना खार लावणे आहे हे त्यांना माहित आहे.
म्हणून ते कधीही उपाययोजनांवर बोलणार नाहीत. प्रश्न जगातील काही शे कोटी सामान्य नागरिकांचा आहे. त्यांनी अर्थ साक्षर होण्याला / करण्याला काही शॉर्टकट नाही.





