Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

ज्येष्ठ प्रकाशक अरविंद पाटकर यांचे निधन; मराठी साहित्य विश्वावर शोककळा

mosami kewat by mosami kewat
January 29, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
ज्येष्ठ प्रकाशक अरविंद पाटकर यांचे निधन; मराठी साहित्य विश्वावर शोककळा
       
पुणे : पुस्तकांच्या दुनियेत ‘मनोविकास’ प्रकाशन संस्था उभी करणारे ज्येष्ठ प्रकाशक अरविंद पाटकर यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अरविंद पाटकर यांचे पहाटे ३ वाजता ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. दुपारी २.३० वाजता पुण्याच्या नवी पेठ येथील वैकुंठ स्मशानाभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने मराठी साहित्य क्षेत्रावर शोककळा पसरली असून, समाजमाध्यमांवर अनेक मान्यवरांनी दिलगिरी व्यक्त केली.

अरविंद पाटकर यांचा प्रवास हा संघर्षातून यशाकडे गेलेला प्रवास होता. त्यांनी सार्वजनिक आयुष्याची सुरुवात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (भाकप) पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून केली. गिरणी कामगार युनियनच्या माध्यमातून त्यांनी शोषितांचे प्रश्न मांडले. मात्र, दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखालील ऐतिहासिक संपाच्या काळात पक्षांतर्गत मतभेद झाले आणि त्यांनी एका वेगळ्या वाटेने जाण्याचा निर्णय घेतला. (arvind patkar)

पक्षातून बाहेर पडल्यावर जगण्याचा प्रश्न समोर असताना अभिनव प्रकाशनचे वा. वि. भट यांचे मोलाची मदत मिळाली. पक्षाच्या सभा आणि आंदोलनांमध्ये पुस्तक विक्रीचा अनुभव पाटकरांना आधीपासूनच होता. याच अनुभवाच्या बळावर त्यांनी ‘विकास बुक सेंटर’ या नावाने पुस्तक विक्रीचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला माटुंगा येथील व्हीजेटीआय महाविद्यालयाबाहेर, त्यानंतर नायर, केईएम, जेजे, सायन अशा मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये त्यांनी पुस्तक विक्री केली.

मुंबई महानगरपालिकेचा जिमखाना, ओल्ड कस्टम हाउस, रिझर्व्ह बँकेची इमारत अशा विविध ठिकाणी त्यांनी पुस्तक प्रदर्शनांचे आयोजन केले.

४ एप्रिल १९८४ रोजी आमदार निवासात पहिले अधिकृत दुकान सुरू झाले. कुडाळमधील प्रदर्शनादरम्यान एका हितचिंतकाने दिलेल्या सूचनेवरून ‘विकास’चे रूपांतर ‘मनोविकास’ मध्ये झाले आणि एका नव्या ब्रँडचा जन्म झाला. (arvind patkar)

१९८५ मध्ये ‘शाहीर’ या पहिल्या पुस्तकाने सुरू झालेला मनोविकासचा प्रवास पुढे थक्क करणारा ठरला. वैचारिक, सामाजिक आणि साहित्यातील कसदार पुस्तके प्रकाशित करून त्यांनी मराठी प्रकाशन विश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. २००५ मध्ये ते पुण्यात स्थायिक झाले आणि तिथूनच त्यांनी मनोविकासचा विस्तार अधिक व्यापक केला. मात्र, त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रातून वेगवेगळ्या भागातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. केवळ पुस्तक छापणे नव्हे, तर वाचकांपर्यंत विचार पोहोचवणे हाच त्यांचा ध्यास होता.” अशा शब्दांत साहित्य वर्तुळातून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Tags: arvind patkararvind patkar passed awaybooksBooks loverMaharashtraPublisherpuneThingsVanchit Bahujan AghadiWriters
Previous Post

जिल्हा परिषद निवडणुकांचे वेळापत्रक बदलले! पाहा मतदान आणि मतमोजणीची नवीन तारीख

Next Post

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांसाठी ३१ जानेवारीला जानवळमध्ये सुजात आंबेडकर यांची सभा!

Next Post
वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांसाठी ३१ जानेवारीला जानवळमध्ये सुजात आंबेडकर यांची सभा!

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांसाठी ३१ जानेवारीला जानवळमध्ये सुजात आंबेडकर यांची सभा!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांसाठी ३१ जानेवारीला जानवळमध्ये सुजात आंबेडकर यांची सभा!
बातमी

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांसाठी ३१ जानेवारीला जानवळमध्ये सुजात आंबेडकर यांची सभा!

by mosami kewat
January 29, 2026
0

लातूर : चाकूर तालुक्यातील जानवळ जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या प्रचाराने आता वेग घेतला...

Read moreDetails
ज्येष्ठ प्रकाशक अरविंद पाटकर यांचे निधन; मराठी साहित्य विश्वावर शोककळा

ज्येष्ठ प्रकाशक अरविंद पाटकर यांचे निधन; मराठी साहित्य विश्वावर शोककळा

January 29, 2026
जिल्हा परिषद निवडणुकांचे वेळापत्रक बदलले! पाहा मतदान आणि मतमोजणीची नवीन तारीख

जिल्हा परिषद निवडणुकांचे वेळापत्रक बदलले! पाहा मतदान आणि मतमोजणीची नवीन तारीख

January 29, 2026
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात सायली चक्रे ‘सुवर्ण पदका’ची मानकरी

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात सायली चक्रे ‘सुवर्ण पदका’ची मानकरी

January 29, 2026
UGC समानता कायदा मध्ये ओबीसी समाविष्ट होताच ‘मंडल’ काळातील विरोधक पुन्हा रस्त्यावर !

UGC समानता कायदा मध्ये ओबीसी समाविष्ट होताच ‘मंडल’ काळातील विरोधक पुन्हा रस्त्यावर !

January 29, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home