राजकीय सामाजिक गुन्हे परत घेण्यासाठी राज्यस्तरीय नियोजन.
मुंबई, दि. २० – महाराष्ट्रातील सामाजिक आणि राजकीय आंदोलनातील गुन्हे व खटले मागे घेण्यासाठी वंचित बहूजन युवा आघाडीचा एक्शन प्लान तयार केला असून कुठल्याही राजकीय सामाजिक आंदोलने ह्यातील सर्वच राजकीय अथवा सामाजिक कार्यकर्त्यां वरील गुन्हे परत घेण्यासाठी मोठी मोहीम सुरू करण्यासाठी राज्यस्तरीय नियोजन करण्यात आल्याची घोषणा वंचित बहुजन युवा आघाडी प्रदेश अध्यक्ष डॉ निलेश विश्वकर्मा ह्यांनी केली आहे.
सार्वजनिक हिताच्या समस्यां व अन्याय अत्याचाराचे घटना घडल्यानंतर राजकीय व सामाजिक संघटना बंद पुकारतात, घेराव घालतात, निदर्शने करून आंदोलन केले जाते. त्यात दाखल गुन्हे मध्ये प्रामुख्याने खैरलांजी पासून ते रमाबाई आंबेडकर नगर, कोरेगाव भिमा, ३ जानेवारी बंद, मराठा क्रांती मोर्चा आणि इतर कोणत्याही आंदोलनात आंदोलकाच्या विरुद्ध दाखल केलेले गुन्हे हे राजकीय किंवा सामाजिक स्वरूपाचे असल्याने ह्या गुन्ह्यातील खटले तपासाअंती मागे घेण्याची तरतूद महाराष्ट्र शासन गृह विभाग शा. नि. क्र. पीआरओ-०१४/प्र.क्र. १२०/विशा -२ दि. १४/०३/२०१६ तसेच त्या पूर्वी २००७, २०१० साली काढण्यात आलेल्या अनेक शासन निर्णयात नमूद आहे.
कोरेगाव भीमा (जिल्हा पुणे) तीन जानेवारी बंद आणि मराठा क्रांती मोर्चासह अगदी आरे जंगल आंदोलन आणि कोविड काळा सहित इतर सर्व राजकीय सामाजिक आंदोलने यातील गुन्हे परत घेण्यासाठी अनेक शासन निर्णय असून सदर गुन्हे परत घेतले गेले नाहीत. त्यात दि.१ जानेवारी २०१८ रोजी घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने महाराष्ट्रात विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनाचे गुन्हे आणि खटले परत घेणे बाबत तसेच मराठा क्रांती मोर्चा प्रकरणात देखील गुन्हे परत घेण्याची तरतूद आहे.
हे गुन्हे काढून घेतांना ज्या आंदोलनात जीवित हानी झाली नसेल आणि ५ लाखापेक्षा अधिक शासकीय संपत्ती चे नुकसान झाले नसेल ते सर्व गुन्हे व खटले काढले जाऊ शकतात.ह्यासाठी वंचित युवा आघाडी राज्य पातळीवर मोहीम उभी करणार आहे.
त्यामुळे महाराष्ट्र राज्यात ज्या राजकीय किंवा सामाजिक कार्यकर्त्या विरुद्ध आंदोलनाचे गुन्हे दाखल असतील त्यांनी 9422160101 ह्या व्हाटसअप नंबर वर जुन्या नव्या सर्व गुन्ह्याची महिती, एफ आय आर नंबर, न्यायप्रविष्ट असल्यास कोर्ट केस नंबर, सर्व आरोपींची नावे मोबाईल नंबर व गुन्ह्यात दाखल केलेली कलम ह्या सहित आपली माहिती पाठवायची आहे.
गुन्हे किंवा खटले काढून घेण्यासाठी लवकरच राज्यपातळीवर बैठकीस आंदोलकांना निमंत्रित केले जाईल.
राजेंद्र पातोडे
प्रदेश महासचिव
वंचित बहूजन युवा आघाडी
महाराष्ट्र प्रदेश.
9422160101