– राजेंद्र पातोडे
बार्टी मध्ये भारतीय संविधान आणि राष्ट्र पुरूषांचे साहित्य लिखाण शासकीय खर्चाने प्रकाशित करून आणि ते विकत घेऊन ते पावसाळ्यात उघड्यावर ठेवून ते भिजून खराब होऊ देणारे अर्थात विटंबना करणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्था पुणे येथील धक्कादायक प्रकरणी वंचित बहुजन युवा आघाडी पुणे कार्यकारणी व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी यांनी पोलिस तक्रार देऊन देखील त्यावर गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करण्यात येत असून बार्टी मधील अर्बन नक्षली विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी पोलिस महासंचालक, राज्यपाल आणि गृहमंत्री ह्यांचे कडे केली आहे.
बार्टी मध्ये भारतीय संविधान, प्रास्ताविका, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य, धम्म संबंधी पुस्तके तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा असलेली पुस्तके बार्टी प्रशासनाने सहा महिने उघड्यावर टाकली होती.पावसात भिजल्यामुळे ते पूर्णपणे खराब झाले आहेत.
त्यामुळे संविधानाचा अपमान करण्यात आला आहे.त्यासाठी राष्ट्रीय सन्मान अपमान प्रतिबंध कायदा, १९७१ अंतर्गत राष्ट्रीय ध्वज, संविधान, किंवा राष्ट्रीय प्रतीकांचा अपमान केल्यास ३ वर्षांपर्यंत कारावास आणि/किंवा दंड होऊ शकतो. राष्ट्रीय सन्मान अपमान प्रतिबंधक कायदा, १९७१ च्या कलम २ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा. हा कायदा राष्ट्रीय प्रतीकांचे (जसे की ध्वज, संविधान, राष्ट्रगीत इ.) संरक्षण करण्यासाठी आहे.कलम २ चे मुख्य तरतुदी नुसार कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी किंवा सार्वजनिक दृश्यात (public view मध्ये) संविधान किंवा त्याच्या कोणत्याही भागाची विटंबना करणे, जसे की ते जाळणे, खराब करणे, अपमानित करणे, बोलण्यातून किंवा वागण्यातून तिरस्कार दाखवणे किंवा अपमानास्पद वर्तन करणे.हा गुन्हा असून बार्टी प्रशासनाने तो गुन्हा केला आहे.
राष्ट्रपुरुषांचा अपमान हा राष्ट्रीय प्रतीकांशी (उदा., संविधानाशी जोडलेला असेल, जसे बाबासाहेब आंबेडकर यांचा संदर्भ) किंवा राष्ट्रीय एकतेच्या विरोधात गुन्हा केला आहे, त्यासाठी हे कलम देखील लावण्यात यावे.
सोबतच धर्म, जाती, भाषा, जन्मस्थान, किंवा इतर आधारावर गटांमध्ये वैमनस्य निर्माण करणे किंवा शांतता भंग करणे.प्रकरणी हे कलम १५३ए नुसार लागू होते. जर राष्ट्रपुरुषांचा अवमान (उदा., बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान) एखाद्या विशिष्ट समुदायाच्या भावना दुखावण्यासाठी किंवा त्यांच्यात द्वेष पसरवण्यासाठी केला गेला असेल, तर हे कलम लागू होते.
कलम २९५ए कोणत्याही समूहाच्या धार्मिक भावना जाणीवपूर्वक दुखावणे साठी हे कृत्य करण्यात आले आहे. बार्टी मध्ये राष्ट्रपुरुषांचा अपमान व धार्मिक संदर्भाशी जोडला गेला आहे (उदा., एखाद्या समुदायाच्या आदर्श व्यक्तीचा अपमान) त्यासाठी देखील हे कलम लागू होऊ शकते.
मात्र पुणे पोलिस आयुक्त क्लास वन अधिकारी यांच्या साठी पंधरा दिवस कार्यवाही करण्यासाठी वेळ मागत आहेत.गुन्हया संबंधी प्राथमिक माहिती अर्थात एफ आय आर दाखल करण्या संबंधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या Lalita Kumari v. Govt. of U.P. हे एक मूलभूत व प्रसिद्ध निर्णय आहे ज्यामध्ये न्यायालयाने स्पष्ट केले की जर प्राप्त माहिती कॉग्नायझेबल अर्थात दखलपात्र गुन्ह्याची घटना प्रकट करत असेल, तर Section 154 CrPC नुसार FIR नोंदवणे अनिवार्य आहे.
154 मध्ये दिलेली माहिती व्याख्या पूर्ण झाल्यास पोलीस तपास न करता FIR नोंदवू शकतात. या निर्णयानुसार, preliminary inquiry (प्रारंभिक चौकशी) करण्याचा अधिकार पोलिसांना नाही, जेव्हा तथ्ये प्रथमदर्शनी (prima facie) गुन्ह्याची घटना दर्शवतात. देशद्रोह सारखी कृत्य घडल्यावर देखील पुणे पोलिस कुणाला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत? सवाल देखील वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश कडून उपस्थित करण्यात आला आहे.
करीता तातडीने गुन्हे दाखल करून संबंधित अधिकारी कर्मचारी ह्यांना अटक न केल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा देखील युवा आघाडीने दिला आहे.
ओबीसी आरक्षणप्रश्नी ओबीसी, भटक्या विमुक्त महासंघाची राज्यव्यापी बैठक संपन्न ; ॲड. प्रकाश आंबेडकर उपस्थित!
औरंगाबाद : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ओबीसी, भटके विमुक्त समाजाच्या आरक्षणावर गदा येण्याची भीती व्यक्त होत आहे, या पार्श्वभूमीवर आज...
Read moreDetails