औरंगाबाद : वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने अशोक वाटिका येथे शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
सामाजिक भान जपत शिक्षण घेणारा एक युवक वंचित समाजातील कष्ट अनुभवून “मी समाजासाठी काहीतरी करेन” या भावनेने जीवनात संघर्ष करणारा सोमनाथ सूर्यवंशी दिनांक १५ डिसेंबर २०२४ रोजी मनुवादी व जातीय द्वेषातून पोलिस कोठडीत अमानुष मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आली होती.

यासाठी त्यांना न्याय मिळण्याकरिता ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केस दाखल करून औरंगाबाद उच्च न्यायालयात आरोपींवर गुन्हे दाखल करायला भाग पाडले होते. हे विशेष त्या निमित्त आज सोमनाथ सूर्यवंशी यांचा प्रथम स्मृतिदिनानिमित्त अशोक वाटिका येथे विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे अकोला जिल्हा अध्यक्ष पी. जे वानखेडे, युवक जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर, महानगर अध्यक्ष वैभव खडसे, माजी महानगर अध्यक्ष जय तायडे, नितीन वानखेडे, प्रसिध्दी प्रमुख शहर नागेश उमाळे, अकोला प्रसिध्दी प्रमुख आकाश जंजाळ, संघटक आकाश गवई, मीडिया प्रमुख सूरज दामोदर, आशिष सोनोने, अमोल वानखेडे, प्रदीप इंगळे,यासह युवा आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.





